आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

85 वर्षीय आईला साखळदंडाने बांधले; म्हणाल्या- उपाशी ठेवतो मुलगा आणि सून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेरठ (यूपी) - येथे 85 वर्षीय वृद्ध आईला घराबाहेर न सांगता कुठे जाऊ नये म्हणून मुलगा व सुनेने साखळदंड बांधून कुलूप लावले आहे. वृद्ध आईनेही याचा विरोध केला नाही. ती दिवसभर साखळदंडाला बांधलेल्या अवस्थेत एका ऑटोच्या सीटवर असते. रात्री मुलगा-सून तिला घरात नेतात. सून म्हणाली, आईला जेवण दिल्यानंतरही त्या म्हणतात की, जेवण देत नाहीत.

 

मानसिक आजारी आहे सासू
- लोहियानगरच्या कांशीराम कॉलनीत वृद्ध आईला साखळदंडाने बांधून कुलूप लावल्याचे प्रकरण समोर आले आहे. येथे राहणाऱ्या आबिदा म्हणाल्या, माझी सासू अकबरी बेगम मानसिकरीत्या आजारी आहे. यामुळे त्यांना काही आठवणीत राहत नाही.
- त्या न सांगता कुठेही निघून जातात. कॉलनीत इथेतिथे फिरताना अनेकदा त्या चक्कर येऊन पडल्या आहेत. यामुळे दुखापतही होते. सासू न सांगता कुठे गेली तर लोक तिला दगडंही मारतात.
- 3 महिन्यांपासून सासूच्या पायात साखळदंड बांधून ठेवले आहे. फक्त दिवसा असे करतो, रात्री आम्ही तिला पुन्हा घरात घेऊन जातो. त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचारही सुरू आहेत.

विसरण्याचा आहे आजार
- आबिदा म्हणाल्या, जेवण दिवसा कितीही वेळा द्या, त्या म्हणतात मी जेवण दिलेच नाही. त्यांना विसरण्याचाही आजार आहे. यामुळे त्यांना असे बांधून ठेवायला आम्ही मजबूर आहोत.
- शेजारी म्हणाले, वृद्ध महिलेचे पती सरकारी नोकरीत होते आणि त्यांच्या मृत्यूनंतर पेन्शनचे पैसे त्यांनाच मिळत आहेत, जे त्यांचा मुलगा खर्च करतो. मुलगा कचेरीत एका वकिलाकडे मुन्शीचे काम करतो.

 

पोलिसांनी केले साखळदंडातून मुक्त
- याप्रकरणी माहिती मिळताच खरखौदा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वृद्ध महिलेची चौकशी केली. यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत आबिदाच्या सासूला साखळदंडातून मुक्त करण्यात आले आणि घरात नेण्यात आले.
- एसपी सिटी मानसिंग चौहान म्हणाले, बुजुर्ग महिलेला साखळदंडात बांधून ठेवल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे पोहोचून त्यांची सुटका केली आहे. कोणत्याही महिलेसोबत असे वर्तन चुकीचे आहे. पोलिस आपल्या पातळीवर जी होऊ शकते, ती कारवाई करत आहेत.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...