आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअलाहाबाद - किन्नर आखाड्यातील महामंडलेश्वर माँ भवानी नाथ वाल्मीकी 2 वर्षांपूर्वीपर्यंत शबनम बेगम नावाने चर्चित होत्या. बोल्ड अंदाजात बोलणाऱ्या मां भवानी नाथ यांचे सौंदर्यच लहानपणापासूनच त्यांच्यासाठी अभिशाप ठरले होते. 2010 मध्ये हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्म कबूल करणाऱ्या भवानी नाथ वाल्मीकी यांनी 2012 मध्ये हज यात्राही केलेली आहे. DivyaMarathi.com ने 16 जानेवारी रोजी अलाहाबादेत संगमावर स्नान करण्यासाठी आलेल्या भवानी नाथ यांच्याशी बातचीत केली.
2017 मध्ये बनल्या महामंडलेश्वर...
- 2015 मध्ये हिंदू धर्मात घरवापसी करणाऱ्या भवानी नाथ 2016 मध्ये अखिल भारतीय हिंदू महासभेच्या किन्नर आखाड्यात धर्मगुरु बनल्या. स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांनी गतवर्षी 2017 मध्ये त्यांना महामंडलेश्वर उपाधि दिली.
- किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर भवानी नाथ वाल्मीकी यांचे वाल्मीकी धाम क्षिप्रा तटावर तिलकेश्वर मार्ग उज्जैनमध्ये आश्रम आहे आणि त्या बहुतांश तेथेच राहतात. त्यांचा एक आश्रम जैतपूर, बदरपूर, न्यू दिल्लीतही आहे.
- 11 वर्षे वयात लैंगिक शोषणाची शिकार झालेल्या भवानी सिंह ऊर्फ महामंडलेश्वर भवानी नाथ यांनी तृतीयपंथीयांबद्दल समाजात असलेल्या कुप्रथा, कुरीती याबद्दल बेधडक बातचीत केली.
गरिबीत 2 वेळचे अन्नही होते कठीण
- महामंडलेश्वर भवानी नाथ यांनी सांगितले, ''वडील चंद्रपाल आणि आई राजवंती यूपीच्या बुलंदशहरात राहत होते. माझ्या जन्माच्या आधीच दिल्लीत येऊन स्थायिक झाले. ते संरक्षण मंत्रालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते.''
- ''आम्ही 8 भाऊ-बहीण आहोत, यात 5 बहिणी आणि 3 भाऊ आहेत. माझा जन्म चांदिकापुरी, दिल्लीत झाला. सध्या मी 45 वर्षांची आहे.''
- ''मी खूप गरीब कुटुंबातून आलेली आहे, वडिलांचा पगार एवढा नव्हता की, पूर्ण कुटुंबाच्या गरजा भागू शकतील.''
10 वर्षांची असतानाच कळले की मी किन्नर आहे, 11 व्या वर्षी झाले लैंगिक शोषण
- ''मी माझ्या भावाबहिणींत सर्वात सुंदर होते, लहानपणीचे तर माहिती नाही, पण जसजशी मोठी होत गेले, तसतसे लोकांकडून बसणारे टोमणे कुतूहल निर्माण करू लागले.''
- ''जेव्हा मी 10-11 वर्षांची होते, तेव्हा त्यांना कळले ती किन्नर आहे. त्या वेही किन्नर आणि सामान्य स्त्री-पुरुषाबद्दल कोणतीही माहिती नव्हती. पण समाजातील लोक माझ्यासोबत इतर मुलांसारखा व्यवहार करत नव्हते. हीच गोष्ट कुठे न कुठे मनात खटकत होती.''
- ''किन्नर असण्यामुळे अडचणी येत होत्या, लोक शोषण करत होते. जेव्हा 11 वर्षांची होते, तेव्हा एका जवळच्याने माझे लैंगिक शोषण केले होते.''
- ''ज्या समाजात लोक आम्हाला आमच्या कुटुंबासोबत राहू देत नाहीत, त्याच समाजातील लोक आम्हाला उपभोगाची वस्तू समजतात.''
जेव्हा सौंदर्य अभिशाप बनले, तेव्हा 13 वर्षे वयात घरदार सोडले...
- ''माझे सौंदर्यच माझ्यासाठी अभिशाप बनले होते. यामुळे 6वीपर्यंत शिकल्यानंतर मी शिक्षण सोडले. घराच्या आसपासचे लोक आणि शाळेतून येता-जाता वाटेत भेटणारे वाईट नजरेने पाहायचे.''
- ''लोकांचे बोलणे आणि स्पर्श करण्याची पद्धत वाईट होती. ही गोष्ट मला आतून खूप त्रास द्यायची.''
- ''13 वर्षे वयात मला किन्नर समाजाकडे जावे लागले, येथे माझ्या पहिल्या गुरू नूरी बनल्या. येथे पोहोचून वाटले की, मी आता माझ्या समाजात आले आहे.''
- ''जेव्हा मी घरातून किन्नर समाजात जाऊ लागले, तेव्हा वडिलांनी थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. पण मी ऐकले नाही. आज वडील या जगात नाहीत, पण आई राजवंती देवीला आपल्यासोबत प्रयाग स्नानासाठी घेऊन आले आहे.''
- ''अस्पृश्यसारख्या तमाम समस्यांशी संघर्ष करत आज मी किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर आहे. 2014 मध्ये मी सुप्रीम कोर्टात जाऊन स्त्री-पुरुषांशिवाय तृतीयपंथींचे नाव जोडायला लावले.''
मोदी समर्थक आहेत भवानी नाथ
- ''मुघल शासनाच्या पूर्वी किन्नर समाज मंदिरांत आणि मठांमध्ये राहायचा. तेथे साज-सज्जा आणि श्रृंगाराचे काम किन्नर करायचे.''
- ''जेव्हा मुघल भारतात आले तेव्हा सर्व किन्नर समाजाला इस्लाम धर्म कबूल करावा लागला. परंतु त्यांनी आम्हाला हजची यात्रा, पाच वेळची नमाज असे सर्व अधिकार दिले, जे सनातन धर्माने नाकारले होते.''
- ''1997 मध्ये दिल्ली काँग्रेसची सदस्यता ग्रहण करणाऱ्या भवानी नाथने 2007 मध्ये काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता, मी मोदी समर्थक आहे.''
- ''माझे वचन आहे की, 2019 मध्ये प्रयागमध्ये होणाऱ्या कुंभ मेळ्यात किन्नर आखाडा अमृत स्नान करेल आणि आपली उपस्थिती नोंद करेल.''
उज्जैनच्या महाकुंभात 2015 मध्ये झाली किन्नर आखाड्याची स्थापना
- 2015 मध्ये उज्जेनमध्ये झालेल्या महाकुंभात किन्नर आखाड्याची स्थापना झाली. ज्यात माँ भवानी नाथ बाल्मीकीही सहभागी झाल्या.
- आता किन्नर आखाड्याला सनातन धर्माच्या इतर 13 आखाड्यांप्रमाणे शासन-प्रशासनात सुविधा उपलब्ध करण्याचे यत्न त्यांनी चालवले आहेत.
- माँ भवानी नाथ यांच्या मते, ''आमच्या जगण्याचे दोनच पर्याय आहेत- एकतर भीक मागा, नाहीतर धंदा करा. दोन्हींमध्ये सुख-सुविधा पुरुषांनाच आहेत. भीक मागतो तेव्हा दुवा देतात. धंधा करतो तेव्हा त्यांना सुख देतो. 2 वर्षांपूर्वी जेव्हा मी शबनम बेगम होते, तेव्हा मीही हेच करायचे.''
- ''जेथे प्रत्येक समाजातील व्यक्तीला आरक्षण मिळत आहे. स्त्री-पुरुषांसाठी वेगळी रांग तयार होत आहे, मग किन्नर समाजासाठी का नाही?''
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, महामंडलेश्वर माँ भवानी नाथ यांचे आणखी फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.