आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: जजची मुलगी बनली \'जालिम गर्लफ्रेंड\', आता दुबईपर्यंत पसरला व्याप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलाहाबाद (उत्तर प्रदेश) - येथील प्राची मिश्राने ग्लॅमर जगतात मोठे नाव कमावले आहे. प्राचीने 2012 मध्ये मिस इंडिया अर्थचा किताब जिंकला होता. 2015 मध्ये प्राचीने बॉलिवूड फिल्म 'दिल्लीवाली जालिम गर्लफ्रेंड'मध्ये काम केले होते. हा प्राचीच्या आयुष्यातील सर्वात खास आणि यशस्वी क्षण होता. यानंतर प्राचीने परत मागे वळून पाहिले नाही. यामध्ये तिला कुटुंबाची चांगली साथ मिळाली. सध्या प्राची इव्हेंट मॅनेजमेंटचा बिझनेस करते. तिच्या उद्योगाचा विस्तार मुंबई ते दुबई पर्यंत झाला आहे. प्राचीचा मोठा भाऊ राहुल मिश्राने त्याची सक्सेस स्टोरी DivyaMarathi.com सोबत शेअर केली. 

 

कधीकाळी इंजिनिअर होती ही अॅक्ट्रेस... 
- अलाहाबाद हायकोर्टात वकील असलेल्या राहुल मिश्राने सांगितले की आमची फॅमिली अलहाबादची आहे. वडील रामचंद्र मिश्रा निवृत्त जज आहेत. सध्या ते बार कॉन्सिल ऑफ यूपीचे सेक्रेटरी आहेत. आम्हा तिघा भाऊ-बहिणीमध्ये प्राची सर्वात छोटी आहे. 
- राहुलने सांगितले, 'प्राचीचे शालेय शिक्षण येथेच झाले. त्यानंतर तिने मथुरेतून इंजिनिअरिंग केले. मथुरेत बी.टेक केल्यानंतर पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये पीजीडीएमए केले. पुण्यात राहात असताना प्राचीने अनेक ब्यूटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेतला आणि विनरही राहिली.'
- राहुल म्हणाला, 'मिस इंडिया अर्थ-2012 मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी प्राचीने आपल्या बॉसला आजारी असल्याचे कारण सांगितले होते. या कॉन्टेस्टमध्ये सहभागी होऊन ती विनर झाली. हा तिच्या आयुष्यातील सर्वात इंट्रेस्टिंग काळ होता.'

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, अलाहाबादची सामान्य मुलगी कशी बनली स्टार... 

बातम्या आणखी आहेत...