आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात: चोरीस गेलेले 20 कोटींचे हिरे सापडले; पाेलिसांनी घेतले दोघांना ताब्‍यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत- गुजरातमधील सुरत शहरात तीन दिवसांपूर्वी सुमारे २० कोटींच्या हिऱ्यांची चोरी झाली होती. पोलिसांनी हिरे जप्त केले असून दोघांना अटक केली आहे. पोलिस उपायुक्त सतीश शर्मा यांनी सांगितले, या प्रकरणात दोन मुख्य आरोपी अर्जुन उर्फ मनीष ठाकूर (२६, रा. मूळ गाव फैजाबाद, उत्तर प्रदेश) आणि मानवेंद्र उर्फ मनीष ठाकूर (२६, मूळ गाव आंबेडकरनगर, उत्तर प्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे. अर्जुनच्या मेहुण्याच्या घरात २२०० कॅरेटचे हिरे पोलिसांनी जप्त केले. गेल्या १४ मार्च रोजी स्टार डायमंड कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर गोळीबार करून तिघांनी २० कोटींचे हिरे लुटले होते.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी माहिती आणि फोटो...