आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तामिळनाडूत Sterlite कंपनीस विराेध; गाेळीबारात ९ जण ठार; प्रदूषण होत असल्याचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तूतिकोरिनमध्ये पोलिस व आंदोलकांत अशी धुमश्चक्री उडाली. - Divya Marathi
तूतिकोरिनमध्ये पोलिस व आंदोलकांत अशी धुमश्चक्री उडाली.

चेन्नई - तामिळनाडूत तूतिकोरिन शहरातील वेदांताच्या स्टरलाइट कंपनीतील तांबे धातू शुद्धीकरण प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनाला मंगळवारी हिंसक वळण लागले. संतप्त जमाव नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार आणि गोळीबारही केला. यात ९ आंदोलकांचा मृत्यू झाला. तर पोलिसांसह ६० जण जखमी झाले. काहींची प्रकृती गंभीर आहे. या कंपनीमुळे माेठे प्रदूषण हाेत असल्याचा ग्रामस्थांचा अाराेप अाहे. दरम्यान, घटनेनंतर जमावबंदी लागू करण्यात आली.  शंभर दिवसापंासून हे अांदाेलन सुरू अाहे.

 

मुख्यमंत्री ई. पलानीसामी यांनी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. २० हजार आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार होते, त्यांना राेखणाऱ्या पाेलिसांवर जमावाने दगडफेक करत जाळपोळ केल्याने परिस्थिती चिघळली.

 

२० वर्षांपासून सुरू आहे कॉपर युनिट
* तूतिकोरिनच्या मीलवितानमध्ये २० वर्षांपेक्षा जास्त काळापासून वेदांता समूहाच्या स्टरलाइट इंडस्ट्रीज इंडिया लि.चा तांबे धातू प्रकल्प सुरू आहे.


* मार्च २०१३ मध्ये येथे वायुगळती झाली हाेती. यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री जयललितांनी प्रकल्प बंद करण्याचे आदेश दिले होते. कंपनीविरुद्ध सुप्रीम कोर्टात राज्य सरकारची याचिका विचाराधीन आहे.

 

कंपनीवर आहेत हे आरोप
तामिळनाडू प्रदूषण नियंत्रण बोर्डाने कंपनी संचालनासाठी दाखल नूतनीकरण अर्ज फेटाळला आहे. कंपनी पर्यावरण नियमांचे पालन करत नाही, असा बोर्डाचा आरोप आहे. कंपनीने भूजल स्थितीचा अहवाल दिलेला नाही. कचरा नष्ट करण्याबाबत काम केले नाही. प्रदूषित पाणी थेट नदीत जाऊ नये म्हणून संरक्षक भिंत उभारली नाही.

 

ग्रामस्थांच्या अांदाेलनाचे कारण
कॉपर कचरा नष्ट न केल्याने कंपनीचे नूतनीकरण करू नये, अशी विनंती राज्य सरकारने प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडे केली हाेती. त्याविराेधात कंपनीने प्राधिकरणात अपील केले असून ६ जूनला सुनावणी आहे. कंपनीने यंदा मार्चमध्ये ४ लाख टन वार्षिक स्टरलाइट कॉपर प्रकल्पाची घोषणा केली. यानंतर लोकांचे आंदोलन सुरू झाले.

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...