आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत तरुणीवर मांत्रिकाने दीड महिना केला जादूटोणा, गल्लीत दुर्गंधी सुटल्याने फुटले 'भोंदू'चे बिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत अनिताचे संग्रहित छायाचित्र. दुसऱ्या फोटोत घरात आढळलेला तिचा मृतदेह. - Divya Marathi
मृत अनिताचे संग्रहित छायाचित्र. दुसऱ्या फोटोत घरात आढळलेला तिचा मृतदेह.

गंगापूर सिटी (जयपूर) - 35 वर्षीय एका मृत विवाहितेला मांत्रिक तिच्या घरातच जिवंत करण्याचा प्रयत्न करत होता. मांत्रिकाने महिलेवर उपचाराच्या बहाण्याने तिचा मृतदेह दीड महिना खोलीत बंद ठेवला. दुर्गंधी सुटू नये म्हणून दररोज अगरबत्ती जाळून खोली सुगंधित करत राहिले.  परंतु जास्तच दुर्गंध सुटल्याने अनिताची बहीण मोहिनीला ही बाब कळली. बहिणीने पूर्ण कहाणी आपला भाऊ श्याम सिंहला सांगितली.  यानंतर भावाने पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली. 

 

असे पकडले चारही आरोपींना...
- पोलिसांनी घरात जाऊन पाहिले असता तरुणीचा मृतदेह खोलीत पडलेला होता. त्यावर कपडेही नव्हते. जागोजागी पट्ट्या बांधलेल्या होत्या.
- मृत विवाहितेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, मांत्रिक सारखा आम्हाला भीती घालत होता. त्याने वेळीच अनितावर वैद्यकीय उपचार घेऊ दिले नाहीत.
- अनिताची बहीण मोहिनीने घरातून पळून जाऊन वेगळा राहत असलेल्या आपल्या भावाला जाऊन सर्व परिस्थिती सांगितली.
- मग दोघाही भावा-बहिणीने पोलिसांत घेऊन घर गाठले. तेथे चारही आरोपी हजर होते.

 

मोहिनीला शोधायला बाहेर गेलेला आरोपी झाला पसार
- जेव्हा मोहिनी घरातून पळून बाहेर गेली होती, तेव्हा मुख्य आरोपी गजेंद्र ऊर्फ पप्पू तिचा शोध घेण्यासाठी वस्तीत फिरत होता.
- परतताना त्याला घराबाहेर पोलिस दिसले. हे पाहून त्याने तिथून पळ काढला.

 

मांत्रिकाने कुटुंबाला असे फसवले जाळ्यात
- मांत्रिकांनी ऊर्मिला देवी व वडील ताराचंद यांना पूर्णपणे अंधश्रद्धेच्या अंधकारात ढकलले होते. त्यांनी अनितामध्ये देवीचा संचार झाल्याची आवई उठवली.
- अनितालाच गादीवर बसवून ते तिच्यामार्फत लोकांवर उपचार करू लागले. घरात लोकांची ही मोठी गर्दी होऊ लागली होती.

 

मुलांनाच आपले घर सोडावे लागले
- ताराचंद यांची तिन्ही मुले श्याम सिंह, गजेंद्र सिंह घरात मांत्रिकांच्या वावरामुळे नाराज होते.
- त्यांनी आईवडिलांना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ते ऐकले नाहीत. शेवटी स्वत:चे घर सोडून ते किरायाच्या घरात राहू लागले होते.

 

म्हणत राहिले अनिता जिवंत आहे...
- दीड महिन्यापासून अनिता खोलीत बंद होती. रूममधून दुर्गंध येत होता. परंतु आईवडिलांना थोडाही संशय आला नाही.
- ते मांत्रिकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत राहिले- "काळजी करू नका अनिता जिवंत आहे". आईवडिलांनी लहान मुलीचेही ऐकले नाही.
- पोलिसांनी सपोटरा येथील रहिवासी गजेंद्र ऊर्फ पप्पू शर्मा, त्याची पत्नी मंजू शर्मा, गोपाल सिंह, बंटी ऊर्फ संदीप शर्मा, महुकला येथील रहिवासी नीटू हनुमान चौधरी यांच्याविरुद्ध कलम 302 व 120 बी अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्या घराला सील केले आहे. अधिक तपास सुरू आहे.

 

पुढच्या स्लाइवर पाहा, या प्रकरणाचे आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...