आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंकरमध्ये लपू शकत नाही मोदी, टीडीपी आमदाराचे पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह्य वक्तव्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विजयवाडा - तेलगु देसम पार्टीचे (टीडीपी) नेते आणि तेलगु अभिनेता नंदमुरी बालकृष्ण यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यास केंद्राने नकार दिल्याने बालकृष्ण यांनी नरेंद्र मोदींना गद्दार म्हटले आहे. याशिवाय बालकृष्ण यांनी काही आक्षेपार्ह्य वक्तव्यही केले आहे. ते म्हणाले, 'मोदी कुठेही लपले, भलेही ते बंकरमध्ये घुसून बसले तरीही भारत माता त्यांना दफन करणार. आता मोदींना विरोध सुरु झाला आहे, आम्ही शांत राहाणार नाही.' बालकृष्ण हे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.टी. रामाराव यांचे चिरंजीव आणि टीडीपीचे आमदार आहेत. भाजपने बालकृष्ण यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. 

 

आम्ही मोदींना आमची ताकद दाखवून देऊ 
- बालकृष्ण म्हणाले, 'भाजप आणि मोदींनी ज्या पद्धतीने टीडीपीसोबत आपले वर्तन ठेवले त्यामुळे आम्हाला संबंध तोडावे लागले. आम्ही चार वर्षे वाट पाहिली होती. या काळात सर्व मार्ग अवलंबून पाहिले, साम-दाम-भेद. आता दंड बाकी आहे. आम्ही मोदींना तेलगु जनतेची काय ताकद असते ते दाखवून देऊ. आता मोदींकडे मागण्याची नाही तर त्यांच्याविरोधात लढण्याची वेळ आली आहे.'
- पंतप्रधानांना चहावाले म्हणत बालकृष्ण म्हणाले, मोदींनी आंध्र प्रदेशला चहात पडलेल्या माशीसारखे तडफडत सोडून दिले आहे. पंतप्रधानांनी तिला वाचवण्याऐवजी तिचाही घोट घेतला आहे. ते 'मक्खी चूस' आहेत. बालकृष्ण यांनी दावा केला की भाजपला आंध्रातून एकही जागा जिंकता येणार नाही. 
- बालकृष्ण म्हणाले, मोदी राज्यात शिखंडीसारखे (महाभारतातील एक पात्र) राजकारण करत आहेत. ते आमच्या शत्रुकडून आमच्यावर हल्ला करत आहेत, मात्र त्यांचा हा डाव येथे चालणार नाही. 

 

भाजपने केली कारवाईची मागणी 
- पंतप्रधानांविरोधात वक्तव्य करणाऱ्या बालकृष्ण यांच्यावर कारवाईची मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. बालकृष्ण यांचे वक्तव्य आक्षेपार्ह्य असल्याचे भाजपने म्हटले आहे. भाजपचे एक शिष्टमंडळ शनिवारी राज्यपाल एसएल नरसिम्हन यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यांनी बालकृष्ण यांच्या विरोधात राज्यपालांना निवदेन दिले. 

बातम्या आणखी आहेत...