आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्राबाबूंची NDAला सोडचिठ्ठी: मंत्री आज राजीनामा देणार; म्हणाले, मोदींनी अपमान केला!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आंध्र प्रदेशला विशेष श्रेणी राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरून बुधवारी रात्री तेलगू देसम पार्टी आणि भाजपमधील बेबनाव अचानक वाढला. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी संध्याकाळी आंध्रला विशेष दर्जा देण्यास स्पष्ट नकार दिला. हा आपला अपमान असल्याचे म्हणत आंध्रचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी रात्री १० च्या सुमारास पत्रपरिषद घेऊन मोदी सरकारमधून बाहेर पडण्याची घाेषणा केली.


ते म्हणाले, तेदेपाच्या कोट्यातील दोन केंद्रीय मंत्री अशोक गजपती राजू आणि वायएस चौधरी गुरुवारी सकाळी पदांचे राजीनामे देतील. राजीनाम्यांची माहिती देण्यासाठीच मोदींना फोन केला हाेता. मात्र ते फोन लाइनवर आले नाहीत. तथापि, नायडूंनी अद्याप एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा केलेली नाही. एनडीए सोडण्याकडे हे आपलेे पहिले पाऊल असल्याचे नायडू म्हणाले.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, अरुण जेटली यांचा आंध्रला विशेष दर्जा देण्यास नकार...

बातम्या आणखी आहेत...