आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीला घरी पोहोचताच फोन करायला सांगितला, परंतु आली मृत्यूजी बातमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमशेदपूर- घरी पोहोचताच फोन करा असे म्हणून महिलेने आपल्या पतिला पाठवले होते, परंतु त्याच्या मृत्यूचीच बातमी आली. सदर महिलेच्या पतिचा अपघातात एक ट्रक खाली येऊन मृत्यू झाला. 
 

चिरडून गेला ट्रक...
मिळालेल्या माहितीनुसार, 40 वर्षाचा राजीव बागबेडा 'राजीव आर्मर ग्रुप ऑफ सिक्युरिटी एजेंसी' चालवत होता. त्याची पत्नी हायस्कूलमध्ये शिक्षिका आहे. राजीव शनिवरी सकाळी आपल्या इनफील्डवरून पत्नीला शाळेत सोडून परतत होते. तेव्हा सकाळी 9 वाजेच्या दरम्यान रोड अपघातात अज्ञात वाहणाने त्यांना मागून धडक दिली. या अपघातात ते गाडीवरून खाली पडले आणि ट्रक खाली चिरडले गेले. या घटनेत राजीवचा जाग्यावरच मृत्यू झाला.  अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह फरार झाला.
 

पत्नीला पश्चाताप, का सोबत गेले....
चंदा जवळपास एक महिन्यापासून छोटी मुलगी गुडियासोबत स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी जुगसलाई येथे वडिल भोला चौधरी यांच्या घरी राहत होती. चंदा रोज बसने शाळेत जात होती, परंतु काही दिवसांपासून राजीव तीला सोडत होते. रोजच्याप्रमाणे शनिवारी देखील जुबिली पार्क येथून मॉर्निंग वॉक करून परतल्यानंतर ते पत्नीला शाळेत सोडण्यासाठी निघाले होते. चंदाला पश्चाताप होतोय की, ती बसने गेली असती तर आज हा अपघात झाला नसता.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...