आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CRIME: टुंडा म्हटल्याने युवकाने घेतला मुलाचा जीव, खेळताना झाले होते भांडण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नारनौंद (हरियाणा) - खेळता-खेळता झालेल्या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले आणि एका 15 वर्षांच्या मुलाला दंडुक्याने मारल्याने त्याचा जीव गेला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी 10 वाजता हिसारमधील कापडो गावात घडली आहे. पोलिसांनी युवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

 

- पोलिसांनी सांगितले, की 10वी शिकणारा विक्की रोजच्या प्रमाणे मित्रांसोबत खेळत होता. तो आणि त्याचे मित्र गिंडी टोरा (लाकडी दंडुका आणि चेंडूने खेळला जाणारा खेळ) खेळत होते. 
- यावेळी गावातील 12वीत शिकत असलेला अरुणचा दंडुका विक्कीच्या नाकावर लागला. यामुळे दोघांमध्ये भांडण झाले. विक्कीने रागात अरुणला टुंडा म्हटले. त्यामुळे भडकलेल्या अरुणने दंडुक्याने विक्कीवर एवढे वार केले की तो जागेवर बेशुद्ध पडला. 
- जखमी विक्कीला त्याचे कुटुंबिय हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

बातम्या आणखी आहेत...