आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन वायुदलप्रमुखांनी भारतात पाक हद्दीपर्यंत उडवले तेजस विमान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर-  अमेरिकेच्या वायुदलाचे प्रमुख जनरल डेव्हिड एल. गोल्डफिन यांनी शनिवारी जोधपूर एअरबेसला भेट दिली. त्यांनी भारतात विकसित आणि कमी वजन असलेले तेजस हे लढाऊ विमान उडवले. एखाद्या परदेशी वायुदलप्रमुखांनी तेजसचे उड्डाण करण्याची ही बहुतेक पहिलीच वेळ आहे. जगभरातील सर्वाेत्तम फायटर जेटच्या उड्डाणांचा अनुभव असलेल्या डेव्हिड यांनी सुमारे ४० मिनिटे विमान उडवले. हे विमान थेट पाकिस्तानच्या सीमारेषेपर्यंत उडवत भारत-अमेरिका संबंध किती प्रगाढ आहेत, याचा संदेश दिला.
बातम्या आणखी आहेत...