आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मिरात दाेन जवान, एका संपादकाची गाेळीबारात हत्या; जवानाचे आधी केले अपहरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - ईदच्या आधीच गुरुवारी काश्मिरात अतिरेक्यांनी दोन मोठ्या कारवाया केल्या. वेगवेगळ्या घटनांत दोन जवानांसह एका संपादकाची हत्या झाली. सुट्टी घेऊन ईद साजरी करण्यासाठी घरी जात असलेल्या लष्कराचा जवान आैरंगजेब याचे शोपियांमध्ये अपहरण करून नृशंस हत्या करण्यात आली. तो हिजबुलचा अतिरेकी समीर टायगर यांचे एन्काउंटर करणाऱ्या टीममध्ये होता. गुरुवारी अपहरणानंतर रात्री आठ वाजता गोळ्यांंनी चाळणी झालेला औरंगजेबचा मृतदेह सापडला.

 

दुसरीकडे, श्रीनगरमध्ये इंग्रजी वृत्तपत्र रायझिंग काश्मीरचे संपादक शुजात बुखारी यांची कार्यालयासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अतिरेक्यांनी त्यांच्या कारवर गोळीबार केला. यात त्यांच्यासह एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. दरम्यान, बांदीपुरात चकमकीत जवानांनी दोन अतिरेक्यांना टिपले, तर एक जवान शहिद झाला. शोधमोहिमेदरम्यान अतिरेक्यांनी गाेळीबार सुरू केला. त्यांंना चाेख प्रत्त्युत्तर देण्यात अाले.  उशिरापर्यंत ही कारवाई सुरू हाेती.

 

शांतीसाठी सक्रिय बुखारी, हत्येचा मुफ्तींनाही शाेक

काश्मीर खाेऱ्यात शांतीसाठी प्रयत्न करणारे ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी सायंकाळी ७.१५ वा. अाॅफिसमधून बाहेर पडले. इफ्तार पार्टीला जाण्यासाठी ते गाडीत बसले तेवढ्यात अतिरेक्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गाेळीबार केला. या हल्ल्यात बुखारींसह एका पाेलिसाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही माहिती कळताच मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती रुग्णालयात पाेहाेचल्या, बुखारींना पाहून त्यांना रडू काेसळले. बुखारींचे भाऊ ‘पीडीपी’चे नेते व मंत्री अाहेत. पाेलिसांनी नाकाबंदी व शाेधमाेहीम सुरू केली. उशिरापर्यंत एकाही अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली नव्हती. हल्लेखाेर चाैघे जण असल्याचे सांगितले जाते. 

 

 जम्मू-काश्मिरात मानवी हक्कांचे उल्लंघन : यूएन

 संयुक्त राष्ट्राने अहवालात जम्मू-काश्मिरात मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा दावा करत अांतरराष्ट्रीय चौकशीची गरज असल्याचे सांगितले. अहवालात पाकव्याप्त काश्मीरचाही समावेश आहे. जम्मू-काश्मिरात मानवी हक्कांवरील यूएनचा अशा प्रकारचा हा पहिलाच अहवाल आहे. त्यात म्हटले आहे, नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूंकडील लोक पीडित आहेत. ते मानवी हक्कांपासून वंचित आहेत वा हे हक्क अत्यंत मर्यादित स्वरूपात आहेत.

 

भारताने अहवाल फेटाळला 

अहवाल भ्रामक, पक्षपाती व पूर्वग्रहदूषित असल्याचे सांगत तो भारताने फेटाळला. परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, अहवालात भारताचे चुकीचे चित्र दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि क्षेत्रीय अखंडत्वाचे उल्लंघन आहे. निवडक ऐकीव माहितीच्या आधारे हा अहवाल तयार केला अाहे.

 

पुढील स्लाईडवर पहा आणखी फोटो ....

 

 

 

बातम्या आणखी आहेत...