आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुपवाडा-पुलवामामध्ये चकमक, 4 अतिरेकी, 1 निदर्शक ठार; ग्रेनेड हल्ल्यात २ जवान जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर- काश्मीरच्या कुपवाडा व पुलवामा जिल्ह्यांत सुरक्षा दलांनी शुक्रवारी ४ अतिरेक्यांचा खात्मा केला. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र-दारूगोळा जप्त करण्यात आला. पुलवामात चकमक सुरू असताना निदर्शकांनी लष्कराच्या जवानांवर दगडफेक केली. या वेळी जवानांनी केलेल्या कारवाईत एक निदर्शक मारला गेला तर १० जखमी झाले. 


अतिरेकी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी चतपोरा गावाला वेढा दिला. अतिरेक्यांना पळून जाता यावे म्हणून निदर्शकांनी जवानांवर दगडफेक सुरू केली. तरीही जवानांनी कारवाई सुरूच ठेवत २ अतिरेकी टिपले. १ अतिरेकी लपून बसलेल्या ठिकाणाहून गोळीबार करत राहिला तेव्हा जवानांनी ते घरच उडवून दिले. दगडफेक करणाऱ्यांना पांगवण्यासाठी जवानांनी हवेत गोळीबार केला. यात फय्याज अहमद खान ठार झाला. त्यामुळे या भागात तणाव आहे. दरम्यान, कुपवाडाच्या कंचना जंगलात जवानांनी एका अतिरेक्याला गोळ्या घातल्या.

 
जवानांवर ग्रेनेड हल्ला
शोपियाच्या अहगाममध्ये अतिरेक्यांनी लष्कराच्या एका पथकावर हातबॉम्ब फेकले. यात दोन जवान जखमी झाले. अतिरेकी पळून जाण्यात यशस्वी झाले. याची जबाबदारी जैश-ए-मोहंमदने स्वीकारली आहे. 

बातम्या आणखी आहेत...