आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकमध्ये बहुमत चाचणीआधी भाजपही अाजमावणार बाहुबळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपचे  एस. सुरेशकुमार - Divya Marathi
भाजपचे एस. सुरेशकुमार

 बंगळुरू - कर्नाटकात शुक्रवारी काँग्रेस-जेडीएस सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. तत्पूर्वी, राज्यात सत्ता स्थापण्यात अपयशी राहिलेल्या भाजपने आता विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत काँग्रेस-जेडीएस अाघाडीसमोर आपला उमेदवार उतरवला आहे. १०४ जागा जिंकणारा विरोधी पक्ष भाजपचे ज्येष्ठ नेते एस. सुरेशकुमार यांनी गुरुवारी आपला अर्ज दाखल केला.

 

११७ आमदारांच्या पाठिंब्याचा दावा     करत असलेल्या आघाडीने काँग्रेसचे रमेशकुमार यांना उमेदवारी दिली. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी बहुमत चाचणीत बहुमत सिद्ध करण्याआधी आपले सामर्थ्य आजमावण्यासाठी भाजपने उमेदवार उतरवला असल्याचे म्हटले जाते. गुरुवारपर्यंत काँग्रेस-जेडीएस आमदार हॉटेलमध्येच बंद होते. १५ मे रोजी निकाल लागल्यापासून ९ दिवस दोन्ही पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेल व रिसॉर्टमध्येच ठेवले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...