आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकाशकांच्या आंदोलनाचे समाराेपाला गालबोट;आयोजनातील ढिसाळपणाबद्दल ठेवला ठपका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराजा सयाजीराव गायकवाड संमेलन नगरी- बडोदे येथील साहित्य संमेलन समाराेपाच्या उंबरठ्यावर पोहोचले असतानाच आयोजनातील ढिसाळपणाबद्दल रविवारी प्रकाशकांनी आंदोलनाचे  हत्यार उपसले हाेते. आयोजकांनी  कबूल केलेल्या सुविधा  ग्रंथ प्रदर्शनातील स्टॉलधारकांना  उपलब्ध करून दिल्या नाहीत, त्यामुळे  प्रकाशकांनी ग्रंथविक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आणि आयोजकांवर ठपका ठेवला.  दरम्यान, अायाेजकांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर मात्र हे अांदाेलन मागे घेण्यात अाले.  


साहित्य संमेलन बडोदे  येथे घेण्याचा निर्णय होताच बहुसंख्य प्रकाशकांनी येथे मराठी पुस्तकांची विक्री काय होणार, असा सवाल करत ग्रंथ प्रदर्शनातून माघार घेतली होती. तरीही बडोद्यातील मराठी भाषकांची संख्या २० लाखांच्या  आसपास असल्याने काही प्रकाशक ग्रंथ प्रदर्शनात  सहभागी झाले होते, पण संमेलनातील उदघाटन कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम, मैफली, समारोप आणि काही परिसंवाद यांना रसिकांची चांगली गर्दी असूनही कडक उन्हामुळे रसिक ग्रंथ प्रदर्शनात फारसे फिरकले नसल्याने प्रकाशकांना अपेक्षित किमान विक्रीही झाली नसल्याची चर्चा  होती. तसेच आयोजकांनी  स्टॉलधारकांकडून भाडे वसूल करूनही किमान सुविधाही न दिल्याने अखेरच्या सत्रात प्रकाशकांनी ग्रंथ विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आणि निषेध व्यक्त केला. मात्र समारोप समारंभ सुरू असल्याने आयोजकांची बाजू समजू शकली नाही. 

 

स्टाॅलधारकांच्या तक्रारी
- ग्रंथ प्रदर्शनाचा परिसर कडक उन्हात तळपणारा असल्याने रसिकांची गर्दी रोडावली  
- ग्रंथ प्रदर्शन परिसरात कुठेही स्वच्छतागृहांची सोय नसल्याने स्टॉलधारकांची कुचंबणा झाली   
- विशेषत: महिला सहायकांना त्रास सोसावा लागला   
- कडक ऊन असूनही पंखे, खुर्च्या, पाणी अशा किमान गरजाही नाकारल्या गेल्या   
- आयत्या वेळी टेबल, खुर्च्यांचे भाडे सक्तीने वसूल केले.   
- संमेलनातील कार्यक्रम पत्रिकेत  रसिकांना ग्रंथ प्रदर्शनाकडे वळायला वावच ठेवला नाही   

बातम्या आणखी आहेत...