आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावर आरोपीचा फोटो काढा; 10 सेकंदांत फोनवर मिळेल डाटा, पंजाब पोलिसांचे अॅप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड- पंजाबच्या कोणत्याही भागात गुन्हा करून फरार झालेल्या गुन्हेगारांना आता पोलिसांपासून लपणे अथवा बचाव करणे सोपे  नाही. त्याचे एक छायाचित्र काढताच अवघ्या दहा सेकंदांत कोणत्याही गुन्हेगाराचे सर्व रेकॉर्ड अॅपद्वारे पोलिसांच्या मोबाइलवर येते. आरोपीने कितीही बेमालूम वेशांतर केलेले असले तरी त्याची माहिती मिळणारच आहे. एफबीआयच्या धर्तीवर पंजाब पोलिसांचे अॅप येत आहे. या अॅपमध्ये राज्यातील ८२ हजार गुन्हेगारांची माहिती दिली आहे. अशा प्रकारची योजना आखणारे पंजाब देशातील पहिले राज्य ठरले आहे. हे अॅप प्रत्येक पोलिसांच्या मोबाइलमध्ये असेल. पंजाब आर्टिफिशयल इंटेलिजन्स सिस्टिम नावाच्या अॅपची चाचणी सुरू आहे. हे अॅप आयजी, डीआयजी रेंज, सर्व एसएसपी, एसएचओज आणि आयओ यांच्याकडे देण्यात आले आहे. लवकरच सर्व पोलिस कर्मचाऱ्यांच्या मोबाइलमध्ये अॅप असेल. 

 

दहशतवादी, गँगस्टर्सपासून साखळी चाेराचे रेकॉर्ड  
या अॅपमध्ये दहशतवादी, माजी दहशतवादी, गँगस्टर्स, कुख्यात गुन्हेगार, साखळीचोर, भुरटे चोर आदींसह सर्व लहान-मोठ्या चोरट्यांची माहिती यात असेल. गुन्हेगाराचे नाव, त्याचा पत्ता, छायाचित्र व गुन्ह्याची सर्व माहिती असेल.  

 

फोटोचे १५० फीचर्स समोर येतील  
एका व्यक्तीच्या छायाचित्रांचे १५० फीचर्स दिसतील. म्हणजे ते छायाचित्र फ्रंट फोटो, बॅक फोटो, साइडचे फोटो याशिवाय संभाव्य मेकअप केलेले, अशा १५० पद्धतीने पाहता येईल. वेशांतर करूनही आरोपीला फार काळ लपता येणार नाही. अॅप लाँच केल्यानंतर कोणाचे गुन्हेगारी रेकॉर्ड जाणून घेण्यासाठी पोलिसांना त्याचा कबुलीजबाब घेणेही गरजेचे नाही. त्याची संपूर्ण माहिती मोबाइलवर येईल. तो कोणत्या प्रकरणात आरोपी आहे, एकदाच तुरुंगाची वारी केलेली असेल तरी त्याची नोंद असेल.

 

३० हजार कैद्यांचे असेल रेकाॅर्ड  

 

या अॅपमध्ये पंजाबमधील विविध तुरुंगात असलेल्या सुमारे ३० हजार कैद्यांचे रेकॉर्ड व कोठडीतील आरेापींचे रेकॉर्ड अपलोड केेले जाणार आहे. कोणत्याही गुन्ह्यात तो एकदाही तुरुंगात गेला असेल तर त्याचेही रेकॉर्ड यात टाकले जाईल. एफआयआर व डीडीआरमध्ये कोणत्याही प्रकरणात नाव असलेल्या व्यक्तीची माहिती व छायाचित्र अपडेट केले जाईल.

 

 सीसीटीव्हीच्या छायाचित्रातून समोर येईल संपूर्ण डाटा
कोणत्याही घटनेत सीसीटीव्हीत चित्रित झालेल्या छायाचित्रामुळेही आराेपीचे रेकॉर्ड मिळेल. त्याचे सीसीटीव्हीवरील छायाचित्र टाकताच  त्याचे संपूर्ण रेकॉर्ड समोर येईल.  

 

बातम्या आणखी आहेत...