आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अचलपूर: अमरावती जिल्ह्यातील वझ्झर नदीपात्राच्या डोहात बुडून चार युवकांचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतवाडा - अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील सापन धरणाच्या पायथ्याशी नदीपात्रातील डोहात गवंडी काम करणारे चार युवक आंघोळीला गेले असता त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २५) दुपारच्या सुमारास घडली.यामध्ये धोतरखेडा येथील आतिश माधवराव नळपते (३२) हा युवक बचावला.

 

शहरातील संतोषनगर येथील चंद्रशेखर दादाराव चव्हाण (२९),         दीपेश गणेश खराटे, (२५), अक्षय राजू ढोरे (२४) व सागर शंकर चंदेलकर (२५) (चौघेही रा. रामनगर, कांडली) अशी बुडून मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत. शुक्रवारी शहरातील गवंडी काम करणाऱ्यांचा सुटीचा दिवस असतो. सुटी असल्यामुळे मृतक चंद्रशेखर, दीपेश, अक्षय, सागर व या घटनेतून सुदैवाने बचावलेला आतिश हे पाचही मित्र दुपारी बाराच्या  शहरापासून १०-१५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वझ्झर येथे गेले. 

 

दीपेश वगळता अन्य तिघांनाही पोहता येत नव्हते. दीपेशचा हात धरून ते सापन डोहात आंघोळीसाठी उतरले. आंघोळ झाल्यानंतर डोहातील पाण्याचा अंदाज घेत चौघेही एकमेकांचा हात धरून डोहात शिरले. त्यात त्यांना जलसमाधी मिळाली.

 

बातम्या आणखी आहेत...