आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातेफिरू प्रियकराची प्रेमासाठी जबरदस्ती... इगो हर्ट झाला म्हणून पार केली हद्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जखमी तरूणी.... - Divya Marathi
जखमी तरूणी....

भोपाळ- मध्य प्रदेश पन्ना जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून एका मथेफिरू प्रियकराने तरुणीच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार केले. त्यानंतर त्याने स्वत: विष प्राशन करून आत्महत्या केली, तर तरूणी गंभीर असून तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पन्ना जिल्ह्यातील गनोर मढिया गावातील राहणाऱ्या 17 वर्षीय तरूणीसोबत ही घटना घडली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, तरूणी पाहाटे शौचासाठी निघाली होती. एकटी पाहून शेजारी राहणाऱ्या 20 वर्षीय तरूण भुपेंद्रने तिला अडवले आणि तिला प्रपोज केले. तरूणीने त्याला नकार दिला आणि पुढे निघून गेली. त्यानंतर संतापलेल्या भुपेंद्रने पुन्हा एकदा तिला अडवले आणि तुझे उत्तर नाहीच आहे का? असे विचारले. यावरून तरूणी त्याच्यावर रागवली आणि त्याला अद्वाद्वा बोलली, यामुळे संपालेल्या भुप्रेंद्रने तिच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार केले. कुऱ्हाडीने गळ्यावर घाव होताच तरूणी जमिनीवर कोसळी. तरूणीला रक्तभंबाळ अवस्थेत पाहून भुप्रेंद्रला वाटले की तिचा मृत्यू झाला आणि तो तेथून पळू गेला. काही वेळानंतर तरूणाच्या कुटुंबीयांना तो नदीच्या किनाऱ्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याच्या तोंडातून फेस येत होता. नातेवाईक त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचा मृत्यू विष प्राशन केल्यामुळे झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


बहिनीला नव्हता पसंत...
जखमी तरूणीला अमनगंड हॉस्पिटलमध्ये घेऊन पोहोचलेल्या भावाने सांगितेले की, सकाळी ती घरातून एकटी निघाली होती, याचाच फायादा आरोपीने घेतला. निर्जन जागा असल्याने त्याने आधी बहीनीला छेडले, जेव्हा बहिनिने त्याला विरोध केला, तेव्हा त्याने तिच्यावर वार केले. भावाने सांगितले की, तो तरूण नेहमी तिला छेडत होता. यापूर्वी देखील त्याने अनेक वेळा प्रपोज करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु बहिनीला तो तरूण पसंत नव्हता.


लग्न ठल्याने होता रागात...
तरूणीने सांगितले की, मी सकाळी जात होते तेव्हा मला पाहून त्याने माझा पाठलाग केला. त्याच्या त्रासामुळे मी माझ्ये शिक्षण सोडले होते. तो म्हणत होता की, माझे तुझ्यावर प्रेम आहे, परंतु मला तो आवडत नव्हता. तरूणीने सांगितले की, तिचे लग्न ठरल्यानंतर तो म्हणाला  होता की, मी असे होऊ देणार नाही, जर तु असे केले तर तुला जिवंत सोडणार नाही. सकाळी देखील तो प्रेम असल्याचे सांगत होता, मी त्याला नकार दिला तेव्हा त्याने कुऱ्हाडीने मझ्यावर वार केले.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...