आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरिबीमुळे पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन 10Km चालला हा माणूस, आता अकाउंटमध्ये 36 लाख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
24 ऑगस्ट 2016 रोजी ओडिशाच्या कालाहांडीमध्ये दाना मांझी यांना आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन चालत जावे लागले होते. आता जगभरातील मदतीमुळे त्यांचे आयुष्य बदलले आहे. - Divya Marathi
24 ऑगस्ट 2016 रोजी ओडिशाच्या कालाहांडीमध्ये दाना मांझी यांना आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन चालत जावे लागले होते. आता जगभरातील मदतीमुळे त्यांचे आयुष्य बदलले आहे.

गरियाबंद - गतवर्षी ऑगस्ट महिन्यात एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि ही घटना माध्यमांतही खूप चर्चेत राहिली. एका व्यक्तीने पत्नीचा मृत्यू झाल्यावर मृतदेह 10 किमी खांद्यावर घेऊन चालला होता. कारण होते गरिबी. पत्नी टीबीने ग्रस्त होती आणि त्याचा मृत्यू झाला. त्याच्याकडे अॅम्ब्युलेन्ससाठीही पैसे नव्हते. परंतु आज त्या व्यक्तीचे आयुष्य बदलले आहे. आज त्यांच्या मुलीला ओडिशा सरकार भुवनेश्वरमध्ये शिकवत आहे. त्यांचे तिसरे लग्नही झाले आहे. आता ते नव्या बाइकवर फिरत आहेत आणि बँकेत 36 लाख रुपये जमा आहेत.

 

अशी आहे पूर्ण कहाणी...
- वास्तविक मंगळवारी दाना मांझी यांनी कालाहांडी जिल्ह्यातील भवानीपाटा येथील एका बाइक शोरूममधून नवी बाइक खरेदी करून आणली. त्यांना नवी बाइक चालवता येत नाही म्हणून त्यांनी पुतण्याला सोबत नेले होते. त्यांची बदललेली परिस्थिती पाहून लोकांना तो काळही आठवला जेव्हा ते देश-विदेशात प्रकाशझोतात आले होते. त्यांना ओडिशा सरकारने इंदिरा आवास योजनेअंतर्गत घर दिले होते. बहरिनचे पीएम प्रिन्स खलिफा बिन सलमान अल खलिफा यांनी 9 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली होती. त्यांना अनेकांनी आर्थिक मदत दिली यामुळे त्यांच्या अकाउंटमध्ये 36 लाखांपेक्षाही जास्त रक्त जमा झाली.

 

यामुळे आले होते चर्चेत
- ही घटना 24 ऑगस्ट 2016ची आहे. ओडिशातील मागास जिल्हा कालाहांडीमध्ये दाना मांझी यांना आपल्या दुसऱ्या पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन 10 किमी चालावे लागले होते. त्यांना रुग्णालयातून मृतदेह घरी नेण्यासाठी एखादे वाहन अथवा अॅम्ब्युलन्सला देण्यासाठी पैसे नव्हते. त्यांच्यासह त्यांची 12 वर्षीय मुलगीही होती. ती वडिलांसोबत चालत होती. हा फोटो सोशल मीडियासहित अनेक प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आणि गरिबीचे हे दु:ख सर्वांनी पाहिले.

फोटो: संदीप राजवाडे

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, यासंबंधित आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...