आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तारूढ टीएमसीने 4713 ग्रामपंचायतच्या जागा जिंकल्या, भाजप दुसरा मोठा पक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - निवडणूक हिंसाचारामुळे देशात प्रकाशझोतात आलेल्या पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीत सत्तारूढ काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे. सायंकाळी उशिरा आलेल्या निकालात टीएमसीने ४७१३ ग्रामपंचायत जागा जिंकल्या, तर सुमारे २,७६२ जागांवर 
पुढे होती.  


राज्यात एकूण ३१,८०२ ग्रामपंचायतीच्या जागा आहेत. निवडणुकीत भाजप दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने ८९८ ग्रामपंचायत जागा जिंकल्या आहेत. १४२ जागांवर पुढे होता.  ३१७ ग्रामपंचायत जागा अपक्षांच्या हातात गेल्या आहेत.   १३६ जागांवर अपक्षांनी आघाडी घेतली होती.  


केवळ ग्रामपंचायत निवडणूक नव्हे तर जिल्हा परिषदेतही टीएमसीचा दबदबा कायम आहे. सुमारे १९ जिल्ह्यांमध्ये टीएमसीने जवळपास क्लीन स्वीप केले आहे. भाजप दुसरा मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. बुधवारी राज्यात अनेक ठिकाणी फेरमतदान झाले होते. यादरम्यान बराच हिंसाचार उसळला होता. हिंसाचारात २२ जणांचा मृत्यू झाला होता. पाच वर्षांतील हा मोठा हिंसाचार आहे.

बातम्या आणखी आहेत...