आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Karnataka : सरकारच्या कामकाजात हस्तक्षेप नाही, एचडी देवेगाैडा यांचे स्पष्टीकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - मुलगा एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होऊ घातलेल्या आघाडी सरकारमध्ये आपला काहीही हस्तक्षेप नसेल, असे माजी पंतप्रधान तथा जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी मंगळवारी स्पष्ट केले.  कुमारस्वामी बुधवारी पद व गोपनीयतेची शपथ घेतील. शपथ समारंभाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. परंतु आघाडी सरकारचा रिमोट देवेगौडा यांच्या हाती राहणार असल्याचा दावा प्रसार माध्यमातून करण्यात आला होता. 

 

त्या पार्श्वभूमीवर देवेगौडा यांनी ही भूमिका मांडली. त्यातही देवेगाैडा यांच्या म्हणण्यानुसार मंत्रिमंडळाची स्थापना केली जाऊ शकते. आघाडी सरकारची स्थापना किंवा त्यात सहभागी पक्षांबाबतचा कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे माझ्या हाती नसेल. त्यात हस्तक्षेप केला जाणार नाही. त्यासाठी समन्वय समिती महत्त्वाची आहे. समितीद्वारे घेतले जाणारे निर्णय सरकारसाठी महत्त्वाचे आहेत.  


‘आघाडीची सूत्रे माझ्या हाती नसतील’  कर्नाटकातील जद (धर्मनिरपेक्ष)-काँग्रेस सरकारच्या स्थापनेमागे किंवा कारभार हाकण्याची जबाबदारी दोन्ही पक्षांची आहे. आघाडीची सूत्रे माझ्या हाती नसतील, असे देवेगौडा यांनी सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...