आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावर पडला रक्ताचा सडा, विखुरले होते बॉडी पार्टस; एवढा भीषण होता अपघात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर - येथे चकेरी परिसरात एका ट्रकने स्कूटी स्वार 3 जणांना चिरडले. यात 2 महिलांसह एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की, शरीराचे अवयव रस्त्यावर विखुरले होते. दुसरीकडे, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहाचलेल्या पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.

 

पाठलाग करून पकडले ट्रक ड्रायव्हरला
- चकेरीच्या रामादेवी उड्डाणपुलावर एक स्कूटी स्वार तरुण दोन महिलांना घेऊन जात होता. तेवढ्यात पाठीमागून येणारा भरधाव अनियंत्रित ट्रक त्यांना चिरडून पुढे गेला. जागेवरच 2 महिला आणि एका तरुणाचा मृत्यू झाला. 
- घटनेनंतर इतरांनी पाठलाग करून ट्रकचालकाला पकडले. यानंतर पोलिसांनी ड्रायव्हरला अटक करून मृतदेहांना पोस्टमॉर्टमसाठी पाठवले.

 

काय म्हणतात पोलिस?
- इन्स्पेक्टर प्रमोद शुक्ला म्हणाले, ट्रकच्या धडकेने दोन महिलांसहित तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. गाडीत आढळलेल्या कागदपत्रांनुसार स्कूटी नीलम या नावावर होती. मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या, ट्रकचालकाला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या भीषण अपघाताचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...