आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तामिळनाडूतील तूतीकोरियनमध्ये स्टरलाइट कॉपर प्लांट बंद, सरकार म्हणाले- जनहितार्थ निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- तामिळनाडू सरकारने तूतीकोरिन स्थित स्टरलाइट कॉपर प्लांट नेहमीसाठी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडून वेदांता ग्रुपचा हा प्लांट सील करण्याचे आदेश दिले आहेत. पर्यावरण आणि पाण्याचा प्रश्न पाहता राज्याच्या नियोजणाचा अहवाल देत जनहितासाठी हा प्लांट कायमस्वरूपी बंद करण्यात यावा असे आदेशात   म्हटले आहे. कंपनीच्या विरोधात सुरू असलेल्या लोकंच्या आंदोलनाला 22 मे रोजी हिंसक वळन मिळाले होते. तेव्हा जमावाला नियंत्रीत करण्यासाठी पोलिसांनी केलेल्या फायरिंगमध्ये 13 लोकांचा मृत्यू झाला होता.


पलानी स्वामी म्हणाले- कंपनीची वीज आधीच कट केली...
- सरकारने आपल्या आदेशात म्हटले आहे की, तामिलनाडू प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या निर्देशांचे समर्थन करते.
- 9 एप्रिलला प्रदूषण नियंत्रण बोर्डाने वेदांताच्या कॉपर स्टरलाइट कंपनीला आपले काम पुढे चालू ठेवण्याची मंजूरी दिली नव्हती. 23 मे रोजी बोर्डाने ही कंपनी बंद करण्याचे आणि यूनिटचे वीज कनेक्शन तोडण्याचे निर्देश दिले होते. यानंतर येथील वीज कनेक्शन बंद करण्यात आले होते.
- मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी सांगितले की, सरकारने लोकांच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.


कमल हासन म्हणाले- हा जनतेचा विजय
- कमल हासन म्हणाले की, स्टरलाइट कंपनी बंद करण्याचा तामिळनाडू सरकारचा हा निर्णय म्हणजे जनतेचा विजय आहे. आदोलाना दरम्यान शहिद झालेल्या लोकांना आपण सलाम करायला हाव आणि त्याच्याकडून शिकायला हवे. तामिळनाडूच्या राजकारणाचे भविष्य येथील लोकांनीच बदलले आहे आणि आता बदल घडून आणण्यासाठी अधिक लोक आपले योगदान देतील. आता देण्यात आलेल्या निर्णयाविरोधातील कोणत्याही कायदेशीर प्रक्रिया सरकारने थांबवायला हवी, त्यामुळे हा निर्णय कायमस्वरूपीसाठी लागू राहिल हे निश्चित होईल.


100 दिवस चालले कंपनीविरोधातील आंदोलन...
स्टरलाइट कॉपर प्लांट बंद करण्यासाठी लोकांनी 99 दिवसांपर्यंत आंदोलन केले. कंपनीच्या परिसरात प्रदूषण पसरत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या कंपनीत धातू वितळवण्यासह कॉपरचे काम होत होते. यामुळे विषारी रसायनांचे प्रदूषण सर्वत्र पसरत आहे.

बातम्या आणखी आहेत...