आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागालँडमध्ये प्रथमच सर्वाधिक 5 महिला रिंगणात; मेघालयात प्रथमच भाजपचे 47 उमेदवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेहिमा /शिलाँग- नागालँड-मेघालयात अाज मतदान हाेत अाहे. नागालँडमध्ये सत्तारूढ एनपीएफची लढत भाजप-एनडीपीपी अाघाडीशी, तर मेघालयात काँग्रेस-भाजप-एनपीपी अशी तिरंगी लढत हाेत अाहे.

 

नागालँडमध्ये ५४ वर्षांत प्रथमच सर्वाधिक ५ महिला रिंगणात

नागालँडमध्ये १२ निवडणुका झाल्या अाहेत; परंतु एकाही महिलेला अामदार होण्याची संधी मिळालेली नाही. यंदा पाच महिला उमेदवार असून, ११.९१ लाख मतदार अाहेत.

 

नागालँडमध्ये विधानसभेच्या ६० जागा अाहेत; परंतु माजी मुख्यमंत्री व एनडीपीपीचे प्रमुख नेफ्यू रियाे यांची बिनविराेध निवड झाल्याने अाता मंगळवारी ५९ जागांसाठी मतदान हाेणार अाहे. त्यासाठी २२७ उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यात पाच महिला अाहेत.  भाजपने नागा पीपल्स फ्रंटशी (एनपीएफ) असलेली अाघाडी ताेडून एनडीपीपीशी हातमिळवणी केली अाहे. भाजपने २०, तर एनडीपीपीने ४० उमेदवार दिले अाहेत. काँग्रेसने १८, तर एनपीएफने ५८ जागांवर उमेदवार उतरवले. राज्यात अातापर्यंत १२ विधानसभा निवडणुका झाल्या अाहेत; परंतु या ५४ वर्षांत एकाही महिलेला अामदार बनण्याची संधी मिळालेली नाही. यंदा एक महिलाही निवडून अाली, तर राज्याच्या इतिहासात प्रथमच एखादी महिला विधानसभेत पाऊल ठेवेल. पहिल्यांदाच पाच महिला रिंगणात उतरल्या अाहेत. २००८ मध्ये सर्वाधिक चार महिला निवडणूक रिंगणात होत्या. 

 

पाचही महिला म्हणतात-  इतिहास घडवू  
नाेकसेन मतदारसंघातील एनपीपीच्या उमेदवार मायांगपुला चांग यांनी ‘निवडणूक जिंकणारी पहिला महिला मीच ठरेल’ असा दावा केला अाहे. ‘या वेळी इतिहास घडणार अाहे’ असे एनडीपीपीच्या उमेदवार काेनयाक यांनी सांगितले. दिमापूर-३ मधील एनपीपीच्या उमेदवार क्रेनू व त्वेंगशांग सतर-२ मधील भाजपच्या उमेदवार राखिला यांनी ‘मी पुरुषांपेक्षा अधिक कामे करून दाखवेन’ असे सांगितले.  

 

 

२० वर्षांनंतर निवडणुकीवर बहिष्कार  
दाेन दशकांनंतर नागालँडमध्ये नागा नेते, नागरी संघटना व मुख्य नागा अादिवासी संघटना ‘हाे-हाे’ने या निवडणुकीवर बहिष्काराची घाेषणा केली अाहे. निवडणूक हाेऊ नये, अशी एनएससीएनचीही इच्छा अाहे. मात्र, निवडणूक हे घटनात्मक कार्य अाहे व नागा नागरिकांच्या समस्या साेडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे केंद्राने स्पष्ट केले अाहे. 

 

मेघालयमध्ये २५ वर्षांत भाजपचे प्रथमच ४७ मतदारसंघांत उमेदवार 

मेघालयात भाजप १९९३ पासून विधानसभा निवडणुका लढवत अाहे. भाजपने या वेळी पहिल्यांदाच सर्वाधिक ४७ जागी अापले उमेदवार दिले अाहेत.

 

मेघालयातही ५९ जागांसाठी मंगळवारी मतदान हाेत अाहे. एनसीपीचे उमेदवार जाेनाथन संगमा यांचा उग्रवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने एका जागेचे मतदान स्थगित करण्यात अाले अाहे. राज्यात ३२ महिलांसह ३७० उमेदवार रिंगणात असून, १८.४ लाख मतदार अाहेत. मेघालयात गत १० वर्षांपासून काँग्रेसचे सरकार अाहे. मात्र, या वेळी त्यांना भाजप व नॅशनल पीपल्स पक्षाचे (एनपीपी) माेठे अाव्हान अाहे.  भाजप राज्यात मागील २५ वर्षे व ५ विधानसभा निवडणुकांपासून अापले उमेदवार देत अाहे. मात्र, या निवडणुकीत पक्षाने सर्वात जास्त ४७ उमेदवार उतरवले अाहेत. या ५ निवडणुकांत केवळ तीनदा अापले खाते उघडले अाहे. अातापर्यंत निवडणूक लढवलेल्या ८० % उमेदवारांची अनामत जप्त झाली अाहे. २०१३ मध्ये भाजपने १३ जागांवर निवडणूक लढवली हाेती; परंतु सर्वांची अनामत जप्त झाली हाेती. पक्षाने २००३ मध्ये सर्वाधिक २८ जागांवर निवडणूक लढवली हाेती व दाेन जागा जिंकल्या हाेत्या. 

 

मुख्यमंत्री मुकुल संगमा व काेनार्ड संगमा यांच्या कुटंुबांतून दाेन उमेदवार मैदानात

 

मुकुल संगमा यांनी काँग्रेस सत्तेत राहावी यासाठी ताकद पणाला लावली अाहे. माजी लाेकसभा अध्यक्ष पी.ए. संगमा यांचे पुत्र काेनार्ड संगमा यांच्या नेतृत्वात एनपीपीने मुकुल संगमांसमाेर माेठे अाव्हान उभे केले अाहे. मुकुल व काेनार्ड हे दाेघेही गाराे हिल्समधील अाहेत. कोनार्ड रिंगणात नाहीत; परंतु त्यांची बहीण अॅगाथा व भाऊ जेम्स हे मात्र मैदानात अाहेत.मुकुल यांच्या कुटुंबातूनही दाेन सदस्य निवडणूक लढवत अाहेत. मुकुल हे अम्पाती, तर त्यांची पत्नी डिक्कांची महेंद्रगंजमधून मैदानात अाहेत.

 

 

भाजपच्या १०० हून अधिक नेत्यांनी केला प्रचार
ईशान्येत फक्त मेघालय व मिझाेराममध्ये काँग्रेसचे सरकार अाहे. ही दाेन्ही राज्ये ख्रिश्चनबहुल अाहेत. मेघालयात भाजपने पूर्ण शक्ती पणाला लावली अाहे. पंतप्रधान माेदी, अमित शहा व केंद्रीय मंत्र्यांसह १०० हून अधिक नेत्यांनी प्रचार केला. काँग्रेसने बीफ व चर्चचा मुद्दा उचलला, तर भाजपने कांॅग्रेसच्या भ्रष्टाचारावर हल्लाबाेल केला.

 

 

काँग्रेस-भाजप व एनपीपीत काट्याची लढत
मेघालयात काँग्रेस-भाजप व एनपीपीमध्ये तिरंगी लढत हाेत अाहे. राज्यात एनपीपी प्रथमच ५७ जागांवर निवडणूक लढवत अाहे. येथे भाजपने एनपीपीपासून अंतर ठेवले अाहे; परंतु मणिपूरमध्ये एनपीपीच्या टेकूवरच भाजपचे सरकार अाहे. त्यामुळे एनपीपी ही भाजपची बी-टीम असल्याचे काँग्रेसकडून सांगितले जात अाहे.  

बातम्या आणखी आहेत...