आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे ट्रॅकवर पडले आजोबा, तेवढ्यात आली रेल्वे; अंगावरून गेली, पण त्यांना खरचटलेही नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गया - रेलवे ट्रॅकवर पडलेल्या एका आजोबांच्या अंगावरून 55 डबे असलेली मालगाडी गेली. पण सुदैवाने या व्यक्तीला साधे खरचटलेही नाही. ही घटना रविवारी सायंकाळी कोडरमा येथील ईश्वर चौधरी हॉल्टजवळ घडली आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हे आजोबा काठीच्या मदतीने रेल्वे ट्रॅक पार करत होते. त्याचवेळी पाय अडखळल्याने ते खाली पडले. ज्येष्ठ व्यक्तीने उठण्याचा प्रयत्न केला मात्र तेवढ्यात मालगाडी आलेली होती. त्यामुळे घाबरून ते आजोबा ट्रॅकवर लोटले. त्यांच्या अंगावरून मालगाडी जायला सुरुवात झाली होती. हा प्रकार पाहून आसपासचे लोक त्याठिकाणी आले. आजोबांनी तसेच लोटून राहण्यास लोक सांगू लागले. जेव्हा रेल्वे पूर्णपणे निघून गेली तेव्हा लोक त्यांना जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. प्रथमोपचारानंतर त्यांना घरी पाठवलण्यात आले. त्यांना या सर्व प्रकारात साधे खरचटलेही नव्हते. 

बातम्या आणखी आहेत...