आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू-मुस्लिम जोडप्याला पासपोर्ट नाकारणाऱ्या अधिकाऱ्याची बदली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - वेगवेगळ्या धर्माच्या दांपत्याला पासपोर्ट जारी करण्यास नकार देणाऱ्या लखनऊ पासपोर्ट सेवा केंद्राच्या एका अधिकाऱ्याची गुरुवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्तक्षेपानंतर गोरखपूरला बदली करण्यात आली. त्याला नोटीसही जारी करण्यात आली आहे. या दांपत्याला पासपोर्टही देण्यात आला आहे. 


मोहम्मद अनस सिद्दीकी आणि तन्वी सेठ यांनी १२ वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. अनसच्या पासपोर्टचे नूतनीकरण व्हायचे होते, तर तन्वी यांनी नव्या पासपोर्टसाठी अर्ज केला होता. पासपोर्ट ऑफिसचे अधिकारी विकास मिश्रा यांनी आपल्याला हिंदू धर्म स्वीकारून पत्नीसोबत सात फेरे घेण्यास सांगितले तसेच तन्वी यांच्या अर्जात मुस्लिम नाव पाहिल्यानंतर त्यांना मुस्लिम नाव ठेवण्याचा सल्ला दिला होता, असा आरोप अनस यांनी केला होता. त्यानंतर त्यांची फाइल सहायक पासपोर्ट अधिकाऱ्याकडे पाठवून दिली. अनस आणि तन्वी यांनी ट्विट करून पीएमओ आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे तक्रार केली. दरम्यान, पासपोर्ट कार्यालयाचे अधिकारी विकास मिश्रा यांनी मी कुठलेही चुकीचे काम केले नसल्याचे सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...