आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तिहेरी हत्याकांड: ज्या घरात संध्याकाळी होता विवाह सोहळा, पित्याने पत्नी-भाऊ-भावजयीचा चिरला गळा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजस्थानमधील पोखरणमध्ये एकाच कुटुंबात तीन जणांचा खून. - Divya Marathi
राजस्थानमधील पोखरणमध्ये एकाच कुटुंबात तीन जणांचा खून.

जैसलमेर - राजस्थानमधील पोखरणची शुक्रवारची सकाळ सर्व गावकऱ्यांना हदरवणारी ठरली. ज्या घरात सायंकाळी मुलींचा लग्न सोहळा होणार होता, तिथे रक्ताचा सडा पडला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तो मानसिकरोगी असल्याचे म्हटले जात आहे. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली.

 

सायंकाळी होणार होते मुलींचे लग्न 
- हत्याकांडाची ही घटना पोखरण जवळील फलसूंड पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रुपसर गावात घडली. 
- ज्या दिवशी मुलींच्या हातावर मेंदी लागणार होती आणि सायंकाळी विवाहसोहळा होणार होता, तिथे रक्ताचा सडा पडलेला होता. 
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दलाराम मानसिकरुग्ण आहे. त्याने पत्नी कमला, भाऊ रेंवताराम आणि सून हरिया यांची धारदार शस्त्राने हत्या केली. त्यानंतर स्वतः विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. 

 

मानसिकरुग्ण असल्याचे नाही स्पष्ट 
- पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्याबरोबर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत मोठा फौजफाटा गावात दाखल झाला. 
- पोलिसांनी सांगितले, की दलाराम भील मानसिकरुग्न असल्याचे सांगितले जात आहे. मात्र याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. 

 

पोलिस तपासत आहे वेगवेगळे अँगल 
- पोलिसांनी सांगितले, या मर्डर केसमध्ये वेगवेगळे अँगल दिसत आहेत. त्या प्रत्येक अँगलने तापस केला जात आहे. 
- हत्येचे कारण आर्थिक तंगी किंवा कौटुंबिग कलह असल्याचे मानले जाते. त्यासोबतच आरोपी मानसिकरुग्ण असल्याचेही म्हटले जात आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनास्थळाचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...