आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिपुरात स्थानिक आमदाराला मुख्यमंत्री करा- आयपीएफटी; बाहेरून पाठिंबा देण्याचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगरतळा- त्रिपुरात भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुराने (आयपीएफटी) स्थानिक आमदाराला मुख्यमंत्री बनवण्याची मागणी भाजपकडे केली आहे. सरकारमध्ये सन्मानजनक स्थान मिळाले नाही तर आपण बाहेरून पाठिंबा देऊ, असा इशाराही पक्षाने दिला आहे.


आयपीएफटीचे प्रमुख एन. सी. देववर्मा यांनी म्हटले आहे की, स्थानिक समुदायातूनच मुख्यमंत्र्याची निवड करण्याची ईशान्येकडील राज्यांची परंपरा आहे. मंत्रिमंडळातही प्रमाणशीर प्रतिनिधित्वासोबतच महत्त्वाचे विभाग आमच्या पक्षाच्या आमदारांना मिळावेत. तसे झाले नाही तर आम्ही विधानसभेतही आमचा वेगळा गट स्थापन करण्याची मागणी करू. भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले आहे. त्यामुळे आमची उपेक्षा होईल, अशी शंका आम्हाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बिप्लव देव यांनी सांगितले की, दोन्ही पक्षांच्या ४३ आमदारांची मंगळवारी बैठक होईल. तिला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हजर राहणार आहेत.

 

मेघालयमध्ये आज संगमांचा शपथविधी

मेघालयमध्ये कोनराड संगमा मंगळवारी आपल्या मंत्रिमंडळासह शपथ घेतील. राज्यपालांनी आपल्याला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले आहे, अशी माहिती संगमा यांनी दिली. राजभवनतर्फे सांगण्यात आले की, संगमा यांना ३४ आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी बोलावण्यात आले आहे. 

 

नागालँडमध्ये भाजपने एनपीएफशी नाते तोडले
नागालँडमध्ये आम्ही निवडणुकीआधी आघाडी केलेल्या एनडीपीपीसोबत सरकार स्थापन करू, अशी माहिती भाजपचे नेते हेमंत बिस्वा शर्मा यांनी दिले. ते म्हणाले की, एनपीएफशी १५ वर्षांपासून असलेले संबंध संपले आहेत. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

 

बातम्या आणखी आहेत...