आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन हजार कोटींचा सिंचन घोटाळा; गुरिंदरला तीन दिवसाची पोलिस कोठडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड- सिंचन विभागातील विविध प्रकल्पात अधिकाऱ्यांशी संगनमत करून कोट्यवधी रुपयांच्या निविदा घेतल्या. यात सुमारे २ हजार कोटींचा घोटाळा करणारा मुख्य आरोपी ठेकेदार गुरिंदरसिंग भापा यास पोलिसांनी अटक केली आहे. या घोटाळ्यात अडकलेल्या अनेक मोठ्या अधिकाऱ्यांची व अकाली नेत्यांची नाव उघड होऊ शकतात.


गुरिंदरसिंग याने बुधवारी मोहाली न्यायालयात शरणागती पत्करली. त्याला १६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या दरम्यान, गुरिंदरकडे अधिकारी व नेत्यांच्या नावाची विचारणा केली जाणार आहे. या नेत्यांना व अधिकाऱ्यांना लाच देऊन गुरिंदर याने सगळे नियम धाब्यावर बसवून सगळ्या निविदा पदरात पाडून घेतल्या आणि इतका प्रचंड आर्थिक घोटाळा केला. अधिकाऱ्यांना त्याने लाच तर दिलीच शिवाय परदेशवाऱ्याही घडवून आणल्या. अनेकांना भेट म्हणून आलीशान गाड्याही भेट दिल्या. गुप्तचर विभागाने चौकशी केल्यानंतर अनेक घोटाळे उघड होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी ८  बड्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल आहेत. 

बातम्या आणखी आहेत...