आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपी आमदाराविराेधात पुरावे नाहीत : यूपी सरकार,आ. सेंगर अटक प्रश्नी हायकोर्टात उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेंगर काही समर्थकांसह रात्री एसएसपी ऑफिसमध्ये पोहोचले होते. त्यांनी सरेंडर केले नाही. - Divya Marathi
सेंगर काही समर्थकांसह रात्री एसएसपी ऑफिसमध्ये पोहोचले होते. त्यांनी सरेंडर केले नाही.

अलाहाबाद/लखनऊ- यूपीच्या उन्नाव जिल्ह्याच्या बांगरमऊचे भाजप आमदार व बलात्कारातील एक आरोपी कुलदीप सेंगरविरुद्ध गुरुवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला, मात्र अटकेस नकार दिला. आमदाराला अटक का केली नाही, असा प्रश्न हायकोर्टाने विचारला. त्यावर सरकार म्हणाले की, पुरेसे पुरावे नाहीत. तपास सीबीआयकडे सोपवला आहे, यामुळे कारवाईही तेच करतील. सरकारने बुधवारी रात्री उशिरा सीबीअाय चौकशीची शिफारस केली. त्याला केंद्राने मंजुरी दिली.  पीडितेनुसार आमदार सेंगर व त्याच्या गुंडांनी गतवर्षी ४ जूनला तिच्यावर बलात्कार केला होता. तिच्या वडिलांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. 

 

राहुल यांच्या नेतृत्वात मध्यरात्री कँडलमार्च
उन्नाव व कठुआ प्रकरणांच्या विरोधात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मध्यरात्री इंडिया गेटवर कँडल मार्च काढला. यात काँग्रेस नेत्यांसह नागरिक सहभागी होते.

 

कठुआ अत्याचार प्रकरण
काश्मीरच्या कठुआत ८ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपींच्या समर्थनार्थ निदर्शने झाली. याविरुद्ध देशभर संतापाचे वातावरण आहे. त्याला हिंदू-मुस्लिम रंग देण्याचा प्रयत्नही झाला. 

 

- माणूस व पशूत फरक असावा, तो आहेही. कठुआत ८ वर्षीय बालिकेसोबत जे झाले त्यावरून असे वाटते की माणूस असणे ही एक शिवीच आहे. जनावरे कित्येक पटींनी बरी.  
- व्ही.के. सिंग, परराष्ट्र राज्यमंत्री

 

कोणत्या कलमानुसार गुन्हा दाखल 
- कुलदीपसिंह सेंगर यांच्याविरोधात गुरुवारी पहाटे भारतीय दंड विधान कलम 363, 366, 376, 506 आणि पॉस्को अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. 

 

भाजपाध्यक्ष अमित शाह रवाना झाल्यानंतर एसएसपी ऑफिस पोहोचले आरोपी आमदार सेंगर 
- भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह बुधवारी लखनऊमध्ये होते. ते लखनऊमधून बाहेर पडल्यानंतर अर्ध्या तासात सेंगर एसएसपींच्या बंगल्यावर पोहोचले होते. आरोपी सेंगर हे भाजपचे आमदार आहेत. एसएसपींच्या बंगल्यावर आल्यानंतर ते माध्यमांना म्हणाले, 'तुम्ही (मीडिया) म्हणाल तिथे येण्यास तयार आहे. तुमच्या चॅनलला चला, तिथे बसू. चॅनलमधील  मित्रांच्या सांगण्यावरुन मी येथे आलो आहे, चॅनलचे सहकारी जिथे म्हणतील तिथे जाण्यास तयार आहे.'

 

हेही वाचा.. 

हायकोर्टाने योगी सरकारकडून मागवला अहवाल, प्रकरण सुप्रीम कोर्टात

 

बातम्या आणखी आहेत...