आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्नावमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे प्रकरण; भाजप अामदारावर आरोपपत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- उत्तर प्रदेशचे भाजपचे बाहुबली आमदार कुलदीप सेंगर यांच्याविरोधात उन्नाव येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात सीबीआयकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले.  गेल्या वर्षी ४ जून रोजी सेंगर यांनी त्यांच्याच निवासस्थानी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा अारोप आहे.  


सीबीआयच्या विशेष न्यायालयात आमदार सेंगर व त्यांचा सहकारी शशीसिंग यांच्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यावरून गुन्हेगारी कट, अपहरण कलमांखाली आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पॉक्सो) कायद्यानुसार आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.  सेंगर यांनी या मुलीला नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केले होते, असा आरोप पीडितेने केला होता. सुमारे दहा महिन्यानंतर सीबीआयकडे या घटनेची चौकशी देण्यात आली होती. या मुलीवर आमदाराच्या निवासस्थानी ४ जून २०१७ रोजी रात्री ८ वाजता अत्याचार करण्यात आले.  आमदाराचा सहकारी शशीसिंग यानेच तिला आमदाराकडे नेले होते, असे सीबीआयला तपासात कळले. या मुलीवर ११ जून ते २० जून २०१७ दरम्यान सामूहिक बलात्कार करण्यात आला, असेही सीबीआयने केलेल्या तपासात आढळले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.   या प्रकरणात संबंधित डाॅक्टर, पोलिस आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे, असे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  


योगींच्या निवासस्थानाबाहेर पीडितेचा आत्मदहनाचा प्रयत्न
पीडितेने लखनऊ येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर हे प्रकरण चांगलेच तापले. दरम्यान, अामदाराच्या भावाने आणि इतरांनी  पीडितेच्या वडिलांना रायफलच्या दस्त्याने बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ पीडितेच्या वडिलांच्या मृत्यूनंतर व्हायरल झाला होता. त्यानंतर हे प्रकरण गाजले. 

बातम्या आणखी आहेत...