आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UP कासगंज हिंसाचार: 123 जणांना अटक, चंदन हत्याकांडातील मुख्य आरोपी 3 सख्खे भाऊ फरार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदन गुप्ता हत्याकांडातील आरोपींचे फोटो पोलिसांनी जारी केले. - Divya Marathi
चंदन गुप्ता हत्याकांडातील आरोपींचे फोटो पोलिसांनी जारी केले.

कासगंज - उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यातील हिंसाचाराचे परिणाम अजूनही दिसत आहेत. 6 वेगवेगळे एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण 123 जणांना अटक झाली असून चंदन गुप्ता हत्या प्रकरणात 20 जणांवर आरोप आहे. त्यापैकी 11 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हत्याकांडाचे मुख्य आरोपी तीन सख्खे भाऊ नसीम, वसीम आणि सलीम वर्की अद्याप फरार आहेत. पोलिसांनी तिघांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. दरम्यान बरेलीचे जिल्हाधिकारी राघवेंद्र विक्रम सिंह यांनी एक फेसबुक पोस्ट टाकली आहे. त्यात म्हटले आहे की पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा मुस्लिम वस्त्यांमध्येच का ? 


काय आहे प्रकरण?
- कासगंज जिल्ह्यात बिलराम गेट चौकात विश्व हिंदू परिषद आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी 26 जानेवारीला बाईक रॅली काढली.
- रॅलीतील घोषणा ऐकून दुसर्‍या समुदायाने त्यावर हरकत घेतली. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर क्षणात हाणामारीत झाले. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. मात्र, या गोळीबारात रॅलीतील एका तरुणाचा मृत्यू झाला. नंतर संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. वाहनांच्या काचा फोडल्या.


रविवारपर्यंत सुरू होता हिंसाचार
- 27 जानेवारीला आंदोलकांनी बाराद्वारी परिसरात तोडफोड करत 4 दुकाने जाळल्याची घटना घडली. 
- 28 जानेवारीला आंदोलकांनी नदरई गेटबाहेर बांकनेरजवळ एका ऑटो पार्टच्या दुकानात आग लावली. तसेच एक कारलाही आग लावली. नंतर अग्निशमन दलाने आग विझवली.


BJP खासदाराने केली चौकशीची मागणी
- राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांचा मुलगा आणि भाजप खासदार राजवीर सिंह यांनी आरोप केला की, इतर पक्षांनी आधीच या गोंधळासाठी तयारी केली होती. एवढ्या कमी वेळात शस्त्रे आणि दगड कुठून आले, याचा तपास व्हायला हवा.

- रविवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृत्यू झालेल्या युवकाच्या वारसांना 20 लाख रुपये मदत जाहीर केली. 

बातम्या आणखी आहेत...