आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी तरूण तिच्या घरी पोहोचला, नंतर घडले असे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

समस्तीपूर- येथील एका गावात बुधवारी एक प्रियकर आपल्या प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी पोहोचला. त्याला पाहून सुरूवातीला प्रकरण तापले, परंतु, लोकांनी समजून सांगितल्यानंतर दोघांचे लग्न लावून देण्यात आले. या प्रकरणाची माहिती पोलिसांना कळाल्यावर नवदाम्पत्यांना पोलिस स्टेशनमध्ये नेऊन दोघांना भविष्यात काहीच अडचन येणार नाही, यासाठी स्टॅम्प पेपरवर घरच्यांच्या सह्या घेण्यात आल्या.


असे आहे संपूर्ण प्रकरण...
- मिळालेल्या माहितीनुसार प्रदीर कुमार आणि आरती कुमार दोघे एकमेकांवर प्रेम करत होते.
- दोघे सज्ञान आहेत आणि त्यांच्यामध्ये शिक्षत असताना प्रेम जडले.
- दोघांच्या प्रेमाची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना आधीपासूनच होती.
- तरूणीच्या घरच्यांना काही हरकत नव्हती, परंतु, तरूणाचे कुटुंबीय लग्नास तयार नव्हते असे सांगण्यात येत आहे.


तरूण असा पोहोचला तरूणीच्या घरी...
- मिळालेल्या माहितीनुसार, तरूणीच्या घरच्यांनी गावातील काही लोकांशी चर्चा केल्यानंतर लोकांनी तरूणाला बोलवून घेण्यास सांगितले.
- यांतर तरूणाला एका बहाण्याने गावात बोलवण्यात आले. येथे तरूणाला लग्नाविषयी विचारले तेव्हा त्याने होकार दिला.
- यानंतर गावकऱ्यांनी गावातील मंदिरात दोघांचे लग्न लावून दिले आणि याची माहीती पोलिसांना दिली.
- दोघांमध्ये भविष्यात काहीही वाद होऊ नये यासाठी एका स्टँम्प पेपरवर घरच्यांच्या सह्या घेण्यात आल्या.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...