आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात गेलेल्या 3 मुलांच्या आईने इस्लाम कबूल करत केले दुसरे लग्न, ISIच्या हनीट्रॅपमध्ये अडकल्याची शक्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किरन बाली हिने पाकिस्तानी पतीसोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. भारतात परत येणार नसल्याचे ती म्हणाली. - Divya Marathi
किरन बाली हिने पाकिस्तानी पतीसोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. भारतात परत येणार नसल्याचे ती म्हणाली.

होशियारपूर (पंजाब) - बैसाखी सणानिमित्त शीखांच्या जत्थ्यासोबत पाकिस्तानात गेलेली तीन मुलांची आई आणि विधवा किरन बालाने मुस्लिम धर्म स्वीकारत दुसरे लग्न केले आहे. ती 15 एप्रिल पासून गायब होती. त्याच दिवशी तिने लाहोर येथील हैजरवाल येथील रहिवासी मोहम्मद अजीमसोबत मुस्लिम रिती-रिवाजानुसार निकाल केला होता. आता तिचे नाव आमना बीबी आहे. गुप्तचर संस्थांनी हे प्रकरण आयएसआयचा हनीट्रॅप असल्याचे म्हटले आहे. कारण महिला पाकिस्तानला जाण्यापूर्वी तिच्या बँक अकाऊंटमध्ये विदेशातून 13 हजार रुपये डिपॉझिट झाले होते. असे कारनामे सहसा आयएसआय करत असते. 

 

लाहोर स्टेशनवर पोहोचताच बेपत्ता 
- किरन बाला होशियारपूर जिल्ह्यातील गढशंकर गावातील रहिवासी आहे. येथून ती बैसाखी सणानिमित्त शीख जत्थ्यांसोबत पाकिस्तानात गेली होती. लाहोरला पोहोचल्यानंतर ती मोहम्मद अजीमसोबत बेपत्ता झाली होती. 
- 15 एप्रिल रोजी किरन बालाने लाहोर येथील जामिया मिलिया मशिदीत जाऊन सुरुवातील इस्लाम कबूल केला आणि त्यानंतर मुस्लिम रिती-रिवाजानुसार मोहम्मद अजीमसोबत लग्न केले. 
- गुरुवारी उशिरा रात्री ही बातमी भारतात येऊन धडकली आणि गुप्तच यंत्रणा कामाला लागल्या.

 

गुप्तचर यंत्रणांनी सुरु केला तपास 
- एसजीपीसीच्या एकाही सदस्याला माहित नाही की किरन पाकिस्तानात कशी पोहोचली. आता गुप्तचर संस्था किरनबद्दल माहिती गोळा करत आहे. तपास यंत्रणांना शंका आहे, की हे पाकिस्तानचे मोठे षडयंत्र आहे. 
- गुप्तचर यंत्रणांच्या कार्यप्रणालीवरही यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर किरन बऱ्याच काळापासून पाकिस्तानमध्ये कोणाशी संपर्कात होती तर तिला इंटेलिजनन्स क्लियरन्स कसे मिळाले? 
- किरन 21 एप्रिल रोजी भारतात परत येणार होती, मात्र आता तिने तीन महिन्यांसाठी व्हिसाची मुदत वाढवून मिळावी, असा अर्ज पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाला केला आहे. 

सासऱ्यांना फोन करुन सांगितले - लग्न केले आहे, मुलांची खुशाली विचारली 
- किरनचे सासरे तरसेम सिंग यांनी सांगितले, की त्यांची सून शीख जत्थ्यांसोबत पाकिस्तानला जाऊ इच्छित होती. त्यामुळे आम्ही होशियारपूर गुरुद्वारा साहिब येथे फाइल तयार करुन एसजीपीसीच्या कर्मचाऱ्यांकडे फिस जमा केली होती. त्यानंतर तिची फाइल मंजूर होऊन ती शीख जत्थ्यांसोबत पाकिस्तानला गेली. 
- चार-पाच दिवसांपूर्वी इंटरनेट नंबरवरुन तिचा फोन आला. किरनने मुलांची खुशाली विचारली आणि सांगितले की मी लग्न केले आहे. सुरुवातीला मला वाटले की ती थट्टा करत आहे. मात्र त्यानंतर माध्यम प्रतिनिधींचे फोन आले आणि धक्काच बसला. 
- पाकिस्तानला जाण्यासाठी माझ्याकडे पैसे आहेत, असे सांगून तिने माझ्याकडून पैसेही घेतले नाही, असे तिच्या सासऱ्यांनी सांगितले. 

 

दिवसभर फेसबुकवर चॅटिंग करायची 
- कुटुंबियांनी सांगितले, की किरन काही दिवसांपासून दिवस-दिवसभर फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर अनोळखी लोकांसोबत चॅटिंग करायची. 

व्हिडिओत सांगितले, भारतात माझ्या जीवाला धोका 
- किरनचा एका व्हिडिओ समोर आला आहे, त्यात तिने भारतात माझ्या जीवाला धोका असल्याचे सांगते. 
- या व्हिडिओमध्ये किरन पाकिस्तानी पतीसोबत लाहोरच्या एका बाजारात मुस्लिम पद्धतीचे कपडे आणि डोक्यावर ओढणी घेतलेली दिसते. 

 

2005 मध्ये केला होता प्रेम विवाह 
- दिल्लीची रहिवासी असलेली किरनने 2005 मध्ये गढशंकर येथील नरिंद्र सिंगसोबत प्रेमविवाह केला होता. 2013 मध्ये नरिंद्रसिंगचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. 
- किरनला तीन मुले आहेत, ती सासरी कुटुंबासोबत राहात होती. 

बातम्या आणखी आहेत...