आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेडवर झोपायचा दीर, पती म्हणायचा- त्याचीही पत्नी बन, महिलाने सांगितली आपबीती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आग्रा- येथील एका दलित महिलेने आपल्यावर मोठ्या दीराने तीन वेळा बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. महिलेचे म्हणणे आहे की, दीराने आधी पत्नीला पळवून लावले आणि आता तो माझ्यासोबत जबरदस्तीने संबंध ठेवत आहे. आरोप हा सुद्धा आहे की, या कामात तिचा पती आणि सासू सुद्धा साथ देत आहे. या प्रकरणी सीओ सदर उदय राज यांचे म्हणणे आहे की, हे प्रकरण आमच्यापर्यंत पोहचले नाही. पीडित महिलेला येथे बोलवून चौकशी केली जाईल. जर यात कोणी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल.

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

 

- पीडि‍ता नेहा (काल्पनिक नाव) ने सांगितले की, ''माझे लग्न 6 मे 2017 रोजी आग्रा येथे राहणा-या आकाशसोबत झाले आहे. लग्नानंतर मोठा दीर कमल वाईट नजरेने बघायचा.''
- ''कमल विवाहित आहे आणि दोन वर्षापूर्वी पत्नीला मारहाण करून घरातून हाकलून दिली.''
- ''एक दिवस मी घरी एकटी होती, कमल आला आणि त्याने माझ्यावर बलात्कार केला. मी पतीला सांगितले तर तो म्हणतो, माझा मोठा भाऊ आहे, मग तुला काय अडचण आहे. त्याचीही पत्नी बनून राहा''

- ''मी सासूला सांगितले तर ती म्हणाली की, मुलाची पत्नी बनून आली आहे, मग मोठ्यासोबतही पत्नी बनून राहा.''

 

बेडवर झोपतो दीर, गुरांच्या गोठ्यात काढते रात्र- 

 

- ''मी जेव्हा जेव्हा माझ्यावर होणा-या अत्याचाराला विरोध केला तेव्हा तेव्हा मला मारहाण केली गेली. यानंतर मला घरात बांधून ठेवले जायचे.''

- ''माझ्याकडून घरातील कामांसह जनावरांची कामे करून घेतली जायची. मला खाण्यासाठी सातूची बाकरी दिली जायची. मी जेव्हा रात्री घरात झोपायला जायचे तेव्हा दीर तेथे आधीच झोपलेला असायचा. त्यामुळे मला मजबूरीने गुरांच्या गोठ्यात झोपावे लागायचे.'

- '' अनेकदा दीराच्या तावडीतून वाचल्यानंतर मागील आठवड्यात 4 जानेवारी रोजी दीराने तिस-यांदा बलात्कार केला. विरोध केला असता माझे तोंड कपड्याने बांधले आणि घरात बांधून ठेवले.''

- ''कशीबशी मी माझी सुटका करून घेतली व बहिणीजवळ पोहचली आणि तिला घटना सांगितली.''

 

सासरचे म्हणाले, राहायचे असेल तर दीराची पत्नी बनून राहा-

 

- पीडितेच्या कुटुंबियांनी नेहाच्या सासरी तक्रार केली असता त्यांनी सांगितले की, जर राहायचे असेल तर कमलची पत्नी बनून राहावे लागेल.

- शुक्रवारी पीडित परिवार सदर ठाण्यात पोहचले तक्रार दाखल केली. आता पोलिसांवर आरोप झाला आहे की, त्यांनी आरोपींवर उपाशी ठेवणे आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे, बलात्काराची तक्रार असताना वैद्यकीय तपासणी करा असे सांगितल्यावर त्यांनी काहीही बोलण्यास असमर्थता दाखवली.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, या घटनेचा व्हिडिओ आणि फोटोज....

बातम्या आणखी आहेत...