आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालखनऊ - पत्नीची मागणी टाळणे पतीला महागात पडले. चिडून जाऊन तिने आत्महत्या केली. पती म्हणाला, ''पत्नी शनिवारी शॉपिंग करण्यासाठी जात होती. पण मी रविवारी जाऊ असे म्हणालो. यामुळे तिला राग आला, ती नाराज झाली. मी ऑफिसमधून संध्याकाळी घरी आलो तेव्हा तिने रूमचे दार आतून बंद केलेले होते. खूप आवाज देऊन ही तिने दार उघडले नाही म्हणून मला बाहेर लॉबीत झोपावे लागले. सकाळी दरवाजा तोडून पाहिले तर ती फासावर लटकलेली दिसली. यानंतर पोलिसांना माहिती दिली.
वर्षभरापूर्वीच झाले होते लग्न...
- ही घटना पीजीआय स्थित वृंदावन येथील आहे. सचिवालयातील शिक्षण विभागात कार्यरत दीपक द्विवेदी आपल्या आईवडील आणि भावासह शहरात राहतात.
- त्यांचे वर्षभरापूर्वी इटावाच्या रहिवासी दीपिका (23) शी लग्न झाले होते. दीपकने सांगितल्यानुसार, ''लग्नानंतर नेहमीच दीपिका छोट्या-छोट्या गोष्टींवर नाराज होऊन खोलीचे दार बंद करून घेत होती किंवा जेवणच करत नव्हती.''
- ''पुढच्या महिन्यात दीपिकाच्या मामेभावाचे लग्न आहे, यामुळे ती शॉपिंग करायला चला म्हणत होती. शनिवारी तिने शॉपिंग करू म्हणून म्हटले, पण ऑफिसचे काम जास्त असल्याने मी तिला आपण रविवारी शॉपिंग करू असे म्हणालो. बस, एवढ्याच गोष्टीवर ती नाराज झाली.''
- ''शनिवार संध्याकाळी उशिरा मी घरी आलो तेव्हा तिने आपल्या खोलीचे दार उघडले नाही. फोन केला तेव्हा तिने कट केला. यामुळे मी बाहेरच्या लॉबीत झोपलो.''
- ''सकाळी 6 वाजता उठल्यावर पत्नीला आवाज दिला तेव्हा आतून काहीच आवाज आला नाही. दरवाजा तोडून पाहिले तर पंख्याच्या हुकाला ती ओढणीचा फास लावून लटकलेली दिसली.''
काय म्हणतात पोलिस अधिकारी?
-सीओ केंट तनू उपाध्याय म्हणाले, आधी माहेरच्यांना मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करायला नकार दिला होता. परंतु नंतर खूप समजावल्यावर पोस्टमॉर्टम करण्यात आले. मृत विवाहितेच्या माहेरच्यांनी सासरच्यांवर कोणताही आरोप केला नाही.
- मृत विवाहितेचा भाऊ सौरभला बहिणीच्या मृत्यूमुळे धक्का बसला आहे. तो सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत मृतदेहाजवळ बसून पोस्टमॉर्टम न करण्या हट्ट करत राहिला.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या प्रकरणाचे आणखी फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.