आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉयलेटच्या आतून येत होता ओरडण्याचा आवाज, दार उघडताच समोर आले हे सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिला प्रवाशाचा पाय रेल्वेच्या टॉयलेटमध्ये फसला होता. - Divya Marathi
महिला प्रवाशाचा पाय रेल्वेच्या टॉयलेटमध्ये फसला होता.

शाहजहांपूर (यूपी) - येथे बुधवारी अहमदाबादहून सुल्तानपूरला जात असलेल्या एक्स्प्रेसमध्ये एका महिला प्रवाशाचा पाय टॉयलेटमध्ये फसला. यानंतर नॉन स्टॉप ट्रेनला शाहजहांपूर स्टेशनवर एक तास थांबवून महिलेची सुटका करण्यात आली. यानंतर तिचा पाय बाहेर काढला गेला. महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती, तिला डॉक्टरच्या पथकासोबत रेल्वेत समोर बसवून पुढे रवाना करण्यात आले.

 

या घटनेचा व्हिडिओ पाहा शेवटच्या स्लाइडवर...

 

असे आहे पूर्ण प्रकरण...
- ही घटना अहमदाबाद सुल्तानपूर एक्स्प्रेसमधील आहे. कोच नंबर एस 6 मध्ये प्रवास करणाऱ्या राजराणी राजेंद्र या आपल्या 2 वर्षांच्या मुलगा वरुणला टॉयलेटसाठी घेऊन गेल्या. तिथे त्यांचा पाय घसरला आणि टॉयलेटमध्ये फसला.
- महिलेचा पाय फसल्याच्या दीड तासानंतर या नॉन स्टॉप रेल्वेला स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर एकवर रोखण्यात आले. येथे रेल्वे कर्मचाऱ्यांनी महिलेचा पाय काढण्यासाठी रेस्क्यु ऑपरेशन सुरू केले. 
- गॅस कटरने पाइप कापून तब्बल तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर पीडित महिलेचा पाय टॉयलेट पाईपमधून बाहेर काढता आला. यानंतर महिलेला डॉक्टरांच्या पथकासोबत पुढे रवाना करण्यात आले.
- महिलेचा पती राजेंद्र म्हणाला, ''आम्ही अहमदाबादहून आमच्या घरी अमेठीला जात होतो. पत्नी मुलाला घेऊन टॉयलेटला गेली, तिथे तिचा पाय फसला. दीड तास पाय फसलेला होता, शाहजहांपूर स्टेशनवर येताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून पत्नीचा पाय बाहेर काढला.
- स्टेशन अधीक्षक ओम शिव अवस्थी म्हणाले, ''महिलेचा पाय ट्रेनच्या टॉयलेटमध्ये फसला होता. तो काढण्यासाठी 57 मिनिटे ट्रेन थांबवण्यात आली. गॅस कटरने टॉयलेटचा पाइप कापण्यात आला, यानंतर महिलेचा पाय बाहेर निघाला. जखमी झाल्याने महिलेला डॉक्टरांच्या टीमसोबत पुढे रवाना करण्यात आले.'' 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज आणि व्हिडिओ... 

बातम्या आणखी आहेत...