आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरियाणामध्ये महिलेवर 40 लोकांचा बलात्कार, पोलिसांची पीडितेची तक्रार घेण्यास टाळाटाळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचकुला - हरियाणातील मोरणीच्या कँबवाला येथील हॉटेलमध्ये चार दिवस हॉटेल मालकासह ४० जणांनी एका महिलेवर बलात्कार केला. पीडितेची तक्रार पंचकुला पोलिसांनी नोंदवून घेण्यास नकार दिला आणि दुसऱ्या पोलिस ठाण्यात नोेंद होईल, असे सांगून बोळवण केली.

 

मनीमाजरा पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल करून आरोपींना पकडले. तेव्हा सर्व हकीकत कळली. यानंतर पंचकुला पोलिसांनी चंदिगडच्या पोलिसांकडून गुन्हा वर्ग करून घेतला. या गुन्ह्यात निष्काळजीपणा दाखवणाऱ्या पोलिसांची मुख्यालयात बदली करण्यात आली. या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पोलिस पथकांची स्थापना करण्यात आली आहे. एसीपी विजय देसवाल यांच्याकडे तपासाची मुख्य जबाबदारी देण्यात आली.

 

अंधविश्वासाने मांत्रिकाने केला १२० महिलांवर बलात्कार
फतेहाबाद जिल्ह्यातील टोहाना गावात बाबा बालकनाथ मंदिराचा पुजारी अमरपुरी उर्फ बिल्लू यास पोलिसांनी १२० महिलांवर बलात्कार केल्याच्या अारोपावरून अटक केली आहे. त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी ही कारवाई एका व्हिडिओच्या आधारे केली आहे. छाप्यात पोलिसांना १२० महिलांशी संबंध ठेवलेले व्हिडिओ सापडले. तसेच पुजाऱ्याच्या खोलीत नशेच्या गोळ्या आणि तंत्र-मंत्राचे साहित्य सापडले. पोलिसांनी सांगितले, बिल्लू समंधबाधा झाल्याचे सांगून महिलांना जाळ्यात ओढत हाेता, अशी पीडितांची तक्रार आहे.

 

बातम्या आणखी आहेत...