आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभिलाई (छत्तीसगड) - एका विवाहितेने 11 महिन्यांच्या मुलीसोबत आगीत होरपळून आत्महत्या केल्याची घटना घडली. तथापि, यात चिमुकलीला वाचवण्यात यश आले आहे. आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी जो तपास केला त्यावरून, महिलेच्या चारित्र्यावर तिच्या सासरच्यांना संशय होता, ज्यामुळे तिचा नेहमी छळ केला जात होता.
पत्नीच्या कॅरेक्टरवर होता संशय, जो वेळेबरोबर वाढत गेला...
- अमलेश्वर येथील खुड़मुड़ा गावातील जानकी सोनकरने 11 महिन्यांच्या मुलीसोबत स्वत:ला आग लावली. यात जानकीचा मृत्यू झाला आणि तिची मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
- पोलिस म्हणाले की, 26 वर्षीय तुलाराम सोनकर रायपूरमध्ये मिस्त्रीचे काम करतो. त्याचे लग्न 2013 मध्ये 23 वर्षीय जानकी देवीसोबत झाले होते. लग्नानंतर काही काळ दोघांमध्ये सर्वकाही ठीक होते. पण त्यानंतर तिचा पती तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. हळूहळू त्याचा संशय वाढतच गेला.
घरात फक्त सासरा होता, तोही बसून पीत होता दारू
बुधवारी तुलाराम कामासाठी रायपूरला गेला होता. सासू भागवत कथा ऐकायला बाहेर गेली होती. घरात फक्त जानकी तिचा सासरा सेवकराम सोनकर आणि तिची एक वर्षाची मुलगी भावनाच होती. संध्याकाळी 7.30 वाजता जानकी स्वयंपाक करत होती. घरात सासरा दारू पीत होता. यादरम्यान ती आपल्या मुलीला तिने आपल्या मुलीला मांडीवर घेऊन अंगावर 5 लिटर रॉकेल ओतून आग लावली. शरीराने आग पकडताच ती जोरजोरात किंचाळू लागली. आगीचा धूर पाहून घरात बसून दारू पिणाऱ्या सासऱ्याने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु जानकीच्या पूर्ण अंगाला आग लागली होती. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी 50 टक्के भाजली.
चुलत सासऱ्याने केली होती छेडछाड, म्हणून वाढले संशयाचे भूत...
चौकशीत खुलासा झाला आहे की, तिच्या चुलत सासऱ्याने 3 वर्षांपूर्वी तिची छेड काढली होती. तेव्हा जानकीचा पती तुलाराम सोनकरने तिला माहेरी पाठवले होते. पण समाजातील लोकांनी बैठक घेऊन समजूत घातली आणि त्याने तिला परत माहेरी आणले. यानंतर तिचा छळ सुरू झाला. मृत जानकीच्या माहेरच्यांनी तिच्या हत्येचा संशय व्यक्त केला आहे.
जानकीचे वडील म्हणाले- माझ्या मुलीला सगळे त्रास द्यायचे...
- जानकीचे वडील विष्णू राम सोनकर म्हणाले की, मुलीला तिच्या सासरचे नेहमी त्रास द्यायचे. ते म्हणाले की, मृत्यूनंतर मुलीची जीभ बाहेर आलेली होती. त्यांनी तिच्या हत्येची शंका व्यक्त करून याची चौकशी होण्याची मागणी केली आहे.
- दुसरीकडे, पोलिस महिलेची हत्या की आत्महत्या अशा दोन्ही पैलूंवर तपास करत आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यावर याप्रकरणी अधिक खुलासा होईल.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, यासंबंधित आणखी फोटोज...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.