आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यशवंत सिन्हांचा अखेर भाजपला रामराम, राजकीय संन्यासाची घाेषणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारच्या जीएसटी आणि नोटबंदीला कडाडून विरोध केला होता. (फाइल) - Divya Marathi
यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारच्या जीएसटी आणि नोटबंदीला कडाडून विरोध केला होता. (फाइल)

पाटणा - गेल्या काही वर्षांपासून भाजपवर नाराज असलेले माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी शनिवारी अखेर पक्ष सोडला. तसेच राजकीय संन्यास घेण्याची घोषणाही केली. भविष्यात आपण कोणत्याही पदासाठी दावा करणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले.


राष्ट्र मंचच्या माध्यमातून विरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आज देशाची परिस्थिती चिंताजनक आहे. जे घडते आहे त्याविरुद्ध आपण बोललो नाहीत तर भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही, असे सिन्हा म्हणाले. संसदेबद्दल ते म्हणाले, संसदेत अत्यंत वाईट परिस्थिती आहे. आपली जबाबदारी निभावण्यात संसद अपयशी ठरली असल्याचे त्यांनी नमूद केले. विरोधी पक्षांनी मांडलेला अविश्वास ठराव लोकसभा सभापतींनी दाखल करून घेतला नाही. सभागृहात लोकशाहीची थट्टा सुरू आहे. वाजपेयी यांच्या काळात कोणत्याही परिस्थितीत संसदेचे कामकाज चाललेच पाहिजे, असा आदेश होता. यासाठी आज सरकार कोणतेही पाऊल उचलत नाही. पंतप्रधानांनी कधीतरी याबाबत विरोधकांशी चर्चा केली आहे का, असा प्रश्न सिन्हा यांनी उपस्थित केला.


या कार्यक्रमाला शत्रुघ्न सिन्हा, तेजस्वी यादव, काँग्रेसच्या रेणुका चौधरी, तृणमूल काँग्रेसचे दिनेश त्रिवेदी, रालोदचे जयंत चौधरी, सपाचे घनश्याम तिवारी, आपचे खासदार संजय सिंह, आशुतोष आदी उपस्थित होते.

 

नोटबंदी - जीएसटीला केला होता विरोध 
- यशवंत सिन्हा यांनी गेल्या 4 वर्षांमध्ये मोदी सरकारच्या धोरणांना कडाडून विरोध केला आहे. त्यांनी मोदी सरकारच्या जीएसटी आणि नोटबंदी सारख्या निर्णयांना जोरदार विरोध केला होता. त्यासोबत काश्मिर मुद्द्यावरुनही त्यांनी सरकारला आरोपीच्या कोठडीत उभे केले होते. 
- एका मुलाखतीत सिन्हांनी दावा केला होता, की नरेंद्र मोदींनी त्यांना भेटीसाठी वेळ दिला नाही. पंतप्रधानांच्या अशा वर्तनामुळे ते अतिशय दुःखी झाले होते. 
- एका लेखात देशाच्या आर्थिक स्थितीवर त्यांनी चिंता व्यक्त केली होती. सिन्हा म्हणाले होते, 'आर्थिक स्थिती अतिशय दययनीय आहे. गेल्या दोन दशकामध्ये खासगीक्षेत्रात सर्वात कमी गुंतवणूक झाली आहे. त्यातच चुकीच्या पद्धतीने जीएसटी लागू करण्यात आले. यामुळे लाखो लोकांचा रोजगार गेला आहे. देशाची आर्थिक स्थिती आधीच खालावलेली असताना नोटबंदीने आगीत तेल ओतण्याचे काम केले.'

 

वाजपेयी सरकारमध्ये होते अर्थमंत्री 
- यशवंत सिन्हा यांचा जन्म 6 नोव्हेंबर 1937 साली पाटण्यात झाला होता. 1998 मध्ये ते प्रथम लोकसभेवर निवडून गेले. झारखंडमधील हजारीबाग येथून ते खासदार होते. 
- माजी पंतप्रधान चंद्रशेखर (1990 ते 1991) यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते. याशिवाय अटल बिहारी वाजपेयींच्या कार्यकाळात ते अर्थमंत्री (1998-2002) आणि परराष्ट्र खाते (2002-2004) सांभाळत होते.
- यशवंत सिन्हा यांचे चिरंजीव जयंत सिन्हा आता मोदी सरकारमध्ये नागरी उड्डाण राज्यमंत्री आहेत. 
  

बातम्या आणखी आहेत...