आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दमणगंगा नदीच्या पुरात अडकला तरुण, यूपीच्या मित्रास फोन करून मिळवली तटरक्षक दलाची मदत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वापी (गुजरात)- केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा नगर हवेली येथील राखोली गावात एक तरुण दमणगंगा नदीकाठावर प्रातर्विधीसाठी गेला होता. दरम्यान, मधुबन धरणातील पाणी नदीत सोडण्यात आले. यामुळे नदीला पूर आला आणि तरुण नदीतील एका खडकावर अडकला. धरणाचे ८ दरवाजे १.५ मीटरपर्यंत उघडण्यात आले होते. तरुणाचा जीव वाचवण्यासाठी प्रशासनास दरवाजे बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्याचबरोबर तटरक्षक दलाकडून हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर तरुणाची सुटका करण्यात बचाव पथकातील जवानांना यश मिळाले. या तरुणाचे नाव सुरेशकुमार (२१) आहे. 


सुटकेनंतर तरुणाने म्हटले, हा माझा पुनर्जन्म 
सुरेश म्हणाला, 'सकाळी ६ वाजता नदीकाठी आलो होतो. अचानक नदीची पाणीपातळी वाढली. त्यामुळे नदीतील एका खडकावर अडकलो. माझ्याकडे घरमालकाचा मोबाइल क्रमांक नव्हता म्हणून उत्तर प्रदेशातील मित्राला फोन केला. मित्राने घरमालकास फोन करून मदतीची विनंती केली. काही वेळानंतर पोलिस व अग्निशमन दलाची गाडी तेथे आली. धरणाचे दरवाजे बंद केल्यानंतर पाणी पातळी कमी झाली. अाज माझा पुनर्जन्मच झाला आहे.' 

बातम्या आणखी आहेत...