आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीर:IPS चा बेपत्ता भाऊ बनला दहशतवादी, बुरहान वानी मृत्यूदिनी हिजबुलने केला दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - काश्मीरमधील एका आयपीएस अधिकाऱ्याचा भाऊ शम्सुल हक हा हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेत समाविष्ट झाला आहे. हिजबुलने रविवारी दहशतवादी बुरहान वानी याच्या मृत्यूदिनी हा दावा केला आहे. शम्सुलचा फोटो सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. पण अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. शम्सुलचा भाऊ 2012 बॅचचा आयपीएस अधिकारी आहे. सध्या तो ईशान्येकडील राज्यांत तैनात आहे. 


हिजबुल मुजाहिदीनने रविवारी सोशल मीडियावर अनेक दहशतवाद्यांचे फोटो पोस्ट केले. 25 वर्षीय शम्सुल शोपियाँ जिल्ह्यात राहतो. श्रीनगरच्या जकुरा येथील सरकारी महाविद्यालयातील बीयूएमएसचा तो विद्यार्थी आहे. मे महिन्यापासून तो घरातून बेपत्ता झाला होता. हिजबुलने जारी केलेल्या फोटोमध्ये शम्सुलचे कोड नेमही आहे. त्याशिवाय तो 25 मे 2018 रोजी हिजबुलमध्ये सहभागी झाला होता, याचा उल्लेखही आहे. यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत 50 हून अधिक काश्मिरी तरुण दहशतवादी संघटनांशी जोडले गेलेले आहेत. 


बुरहान वानीच्या मृत्यूदिनी रविवारी अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली होती. जम्मू-काश्मीरचे डीजीपी एसपी वैद यांनी सांगितले होते की, अमरनाथ यात्रेकरूंची सुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. काहीही अघटीत घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...