आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीत दलालाने पत्नीला पळवून नेल्याने तरुणाने केली आत्महत्या, पैसे देऊन खरेदी केली होती युवती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बागपत - उत्तर प्रदेशमध्ये बागपतच्या सरूरपूर गावात एक तरुणाने तरुणीस २२ हजार रुपयांत खरेदी करून तिच्याशी लग्न केले. तरुणी विकणाऱ्या दलालास तो पैसे देऊ न शकल्याने दलात पत्नीला घेऊन गेला. यामुळे निराश होत तरुणाने फाशी लावून आत्महत्या केली.

 

चार दिवसांपूर्वी येथे भट्टेवर एका तरुण व तरुणीचे लग्न झाले होते. त्याने दलालास १७ हजार रुपये दिले होते. ५ हजार रुपये नंतर देण्याचे ठरले होते. लग्नानंतर चार दिवसांनी तरुण पैसे देऊ न शकल्याने मुकेश नावाचा दलाल त्याच्या पत्नीला घेऊन गेला. नोतवाइकांनी पोलिसांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.