आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेला निर्वस्त्र करून बाजारात फिरवण्याच्या प्रयत्न, 13 जण पोलिसांच्या ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गमला (झारखंड)- डुमरी येथील कटइटोली गावात रविवारी संध्याकाळी 30 वर्षीय महिलेला निर्वस्त्र करून बाजारात फिरवण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोलिसांनी 13 लोकांना ताब्यात घेतले आहे. यात 12 महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. एसपी अंशुमन कुमार यांनी सांगितले की, यातिल 10 वर एफआयर दाखल आहे. पोलिस चौकशीनंतर त्या दहा आरोपींना जेलमध्ये पाठवण्यात येईल. अवैध संबंधामुळे गावकऱ्यांनी महिलेला अशी शिक्षा देण्याचा प्रयत्न केला असे सांगण्यात येत आहे. परंतु ऐनवेळी पोलिस पोहोचले आणि महिलेला ठाण्यात घेऊन आले. 


प्रियकराला देखील घेतले ताब्यात...
 पोलिसांनी अरूणला देखील ताब्यात घेतले आहे. गावकऱ्यांनी सांगितले की, अरूणने देखील आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दुसरे लग्न केले होते. परंतु, त्याच्या छळाला कंटाळून ती माहेरी निघून गेली. यानंतर त्याने सदर महिलेला आपल्या जाळ्यात अडकवले होते.

 

फोटो: आरिफ हुसैन अख्तर

पुढील स्लाइडवर वाचा गावकऱ्यांनी महिलेला निर्वस्त्र केले....

बातम्या आणखी आहेत...