आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 वर्षीय बलात्कार पीडितेने दिला मुलाला जन्म; अाराेपी तिच्या कुटुंबाला देताेय धमक्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- ही कथा अाहे उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील १४ वर्षीय नेहा (नाव बदलले आहे) नावाच्या मुलीची. लाेहियापुरम माेहल्ल्यात ती तिच्या विधवा अाईसाेबत राहते. तिच्या घरापासून दाेन-तीन घरे दूर राहणाऱ्या पंकजने (नाव बदलले आहे) गाेड-गाेड बाेलून नेहावर बलात्कार केला. याप्रकरणी पाेलिसांनी पंकजला अटक केली; परंतु ताे जामिनावर मुक्त झाला. त्यानंतर त्याने नेहाच्या कुटुंबाला धमकावणे सुरू केले. त्यामुळे नेहा प्रचंड नैराश्यात अाहे. पूर्वी ज्या गल्लीत ती मैत्रिणींसह खेळायची-फिरायची, तेथे अाता तिच्याशी कुणीही बाेलत नाही. 

बलात्कारानंतर काही महिन्यांनी एक दिवस पाेटात दुखू लागल्याने तिची अाई तिला डाॅक्टरकडे घेऊन गेली. तेथे नेहा चार महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अाईने मारहाण केल्यावर तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर अाई नेहाला साेबत घेऊन पंकजच्या घरी गेली असता, त्याच्या अाई-वडिलांनी समजूत घालून दाेघांना परत पाठवले. तसेच दाेघांचे लग्न लावून देऊ, असा दिलासाही दिला; परंतु मुलगी पासी म्हणजेच खालच्या जातीची व मुलगा कुशवाह जातीचा असल्याचे सांगत लग्नास नकार दिला.


ही घटना गेल्या वर्षाच्या जुलैची अाहे. नेहाची अाई तिला जुलैत रुग्णालयात घेऊन गेली. तेथे तिने अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्याची अनेकदा विनंतीही केली; परंतु गर्भपाताची वेळ निघून गेल्याचे व मुलीच्या जीवास धाेका असल्याचे सांगून तसे करण्यास डाॅक्टरांनी नकार दिला. त्यामुळे ४ अाॅगस्ट २०१७ राेजी नेहाच्या अाईने वकिलाच्या सल्ल्यानुसार पाेलिस ठाण्यात जाऊन एफअायअार दाखल केली. त्यानुसार पाेलिसांनी पंकज व त्याच्या वडिलांना अटक केली. याप्रकरणी पंकजची रवानगी कारागृहात झाली, तर त्याच्या वडिलांना मुक्त करण्यात अाले. मात्र, त्यानंतर पंकजच्या अाई-वडिलांनी मुलगा अल्पवयीन असल्याचे सांगितले; परंतु त्याच्या अाई-वडिलांनी मुलगा अल्पवयीन असल्याचे खाेटे प्रमाणपत्र बनवल्याचा अाराेप नेहाच्या अाईने केला अाहे. त्यानुसार ३ अाॅगस्ट २०११ राेजी बनलेल्या त्याच्या अाधार कार्डात जन्मतारीख ३ फेब्रुवारी १९९७ अशी अाहे. मात्र, या घटनेनंतर १ सप्टेंबर २०१७ला बनलेल्या स्कूल ट्रान्सफर सर्टिफिकेटवर जन्मतारीख ३ फेब्रुवारी २००० अशी अाहे. याच कारणामुळे पंकजची सर्वसामान्यरीत्या कारागृहाएेवजी फैजाबादच्या बाल कारागृहात रवानगी करण्यात अाली अाहे. तेथे चार-पाच महिने राहिल्यानंतर जामिनावर त्याची सुटका झाली. त्यानंतर दाेन महिन्यांपासून ताे गावात खुलेअाम फिरत असून पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांना धमक्यादेत आहे . 


या दुर्दैवी घटनेमुळे नेहासाठी तिचे घरच कारागृह बनले अाहे. तिला घरातच कोंडून घअयावा लागत आहे. गतवर्षी २८ नाेव्हेंबरला तिने एका मुलाला जन्म दिला. तिची शरीरप्रकृती एवढी ढासळली हाेती की, तिचा हिमाेग्लाेबीन स्तर ४ पर्यंत घसरला हाेता. तिला वाचवण्यासाठी दाेन बाटल्या रक्त चढवले गेले. ती यातून सुखरूपपणे घरी परतली; परंतु अाता घराबाहेर पडणे तिच्यासाठी कठीण झाले अाहे. 


एवढेच नव्हे, तर पंकज अाता नेहाच्या कुटुंबाला धमक्या देत अाहे. तसेच ितच्या अाईला घाबरवण्यासाठी त्यांच्यावर १२ हजार रुपये उधार घेतल्याचा अाराेपही करत अाहे. नेहाच्या अाईला एवढी रक्कम उभी करणे शक्य नाही. त्यामुळे या भीतीने तरी ती अापल्यावरील गुन्हा मागे घेईल, असे त्याला वाटत असावे. त्यामुळे आता पोलिसांनी या घटनेकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...