आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 2018 Honda X Blade 160 Launched At Rs. 78500 With Robo Face

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

160ccच्या दमदार इंजिनासह होंडाची बाइक लाँच, मिळतील एवढे हायटेक फीचर्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - होंडाने आपली बाइक X-Blade ला भारतात ऑफिशियली लॉन्च केले आहे. कंपनीने या बाइकची बुकिंग याआधीच सुरू केली होती. नुकत्याच झालेल्या ऑटो एक्स्पो 2018 मध्ये ही बाइक लॉन्च करण्यात आली होती. यानंतर कंपनीने 5 हजार रुपयांत याची प्री-बुकिंग सुरू केली होती. बाइकची डिलिव्हरी कस्टमर्सना या महिन्यापासून केली जाईल. होंडाने या स्पोर्टी लूकसोबतच पॉवरफुलही बनवले आहे. बाइकची दिल्ली एक्स-शोरूम प्राइस 78,500 रुपये आहे. बाइकला रोबो-फेस देण्यात आला आहे.


# 160CC इंजनची बाइक
होंडा X-Blade मध्ये 160CC चे एअर-कूल्ड पॉवरफुल इंजिन देण्यात आले आहे. जे 13.9bhp आणि 13.9Nm टॉर्क जनरेट करते. बाइकमध्ये 12 लिटरची पेट्रोल टँक आहे. या बाइकचे मायलेज तब्बल 50 किमी प्रति लीटर असेल. बाइकचे वजन 140 किलो आहे. X-Blade ची रेजर शॉर्प डिझाइन आहे. यात फुल LED हेडलॅम्प आणि पोझिशन लॅम्प आहे. यात टेल लॅम्पही LED आहे. यात 5 कलर व्हेरिएंट मॅट मार्व्हल ब्लू मेटॅलिक, मॅट फ्रोझन सिल्व्हर मेटॅलिक, पर्ल स्पार्टन रेड, पर्ल इग्नेयस ब्लॅक आणि मॅट मार्शल ग्रीन मेटॅलिकमध्ये लाँच केले आहे.

 

# अलॉय व्हील आणि कॉम्बी ब्रेक सिस्टिम
या बाइकमध्ये अलॉय व्हीलसोबतच कॉम्बी ब्रेक सिस्टि्म असेल. बाइकमध्ये रिअर आणि फ्रंट टायर 17-इंचांचे देण्यात आले आहेत. यात 5 गिअर बॉक्स आहेत. यात डिजिटल इंस्ट्रूमेंट कन्सोल देण्यात आला आहे. यात स्पीडोमीटर, टेकोमीटर, ट्रिप मीटर, फ्यूएल गेज, गिअर इंडिकेटर आणि सर्व्हिस रिमाइंडरही डिजिटल असेल.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या बाइकचे आणखी काही फोटोज..