आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारमध्ये झाडाला धडकून तलावात कोसळली कार, 6 चिमुरड्यांचा मृत्यू, 10 जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अररिया (बिहार) - येथून 24 किलोमीटर अंतरावरील ताराबाडी परिसरात मंगळवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास एक कार तलावात कोसळली. या अपघातात 6 मुलांचा मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की, अपघात घडला तेव्हा कार प्रचंड वेगामध्ये होती. मदतकार्यादरम्यान एका मुलाला वाचवण्यात आले आहे. कारमध्ये 12 जण प्रवास करत होते. 


रसत्याच्या कडेला उभे असलेले लोकही कारने उडवले गेले 
स्थानिक लोकांनी सांगितले की, जेव्हा कार (स्कॉर्पियो) अनियंत्रित झाली तेव्हा रस्त्याच्या कडेला उभे असलेले लोकही कारमने उडवले त्यामुळे जवळपास 10 जण जखमी झाले. त्यात चार मुलांचा समावेश आहे. असे म्हटले जात आहे की, तलावात पाणी असल्याने जास्त नुकसान झाले. पण अद्याप हे स्पष्ट झालेले नाही की, मृत्यू अपघाताने झाला की पाण्यात बुडून. 


मृतांचे वय 8 ते 12 वर्षे 
अपघातात गोलू कुमार (8), रिंकी कुमार (9), करण कुमार (11), मिथुन कुमार (9), अजय कुमार (12) आणि नितीश ऋषिदेव (12) यांचा मृत्यू झाला. 

 

 

बातम्या आणखी आहेत...