आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Cartoon शोची नक्कल करताना बसली फाशी, 8 वर्षाच्या मुलीचा वेदनादायी मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये 8 वर्षांच्या एका मुलीचा एका कार्टून शोची नक्कल करताना फाशी लागून मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार तिने कार्टून शोची नक्कल करताना टॉवेलने फाशीचा फास तयार केला होता. तो तिने डोक्यात टाकला आणि खरंच फाशी लागून तिचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे या मुलीला कार्टून शो बरोबरच क्राइम शो पाहण्याचीही प्रचंड सवय होती. 

 

रोलींगला लटकली होती चिमुरडी..
- दुसरीच्या वर्गात शिकणारी चिमुरडी पुजा मजुमदारचा मृतदेह तिच्या आईला बिल्डिंगच्या पायऱ्यांना लावलेल्या रोलींगला लटकलेल्या अवस्थेत दिसला. पुजाच्या आईने सांगितले की, त्या कामाच्या निमित्ताने बाहेर गेल्या होत्या. त्या परतल्या तेव्हा मुलीचा मृतदेह त्यांना पायऱ्यांच्या रोलींगला लटकलेल्या अवस्थेत आढळला. तिच्या गळ्यात टॉवेलचा फास होता. 
- घटनेच्या वेळी घरात असलेली पुजाची बहीण म्हणाली की, दुपारी आई बाहेर गेल्यानंतर त्या सोबत खेळत होत्या. काहीवेळाने ती झोपायला गेली आणि पुजा खेळत होती. त्याचवेळी हा अपघात घडला. 


कार्टून आणि क्राइम शो पाहण्याची सवय 
- कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, पुजाला कार्टून आणि क्राइम शो पाहण्याची सवय होती. ती कार्टून शोच्या कॅरेक्टर्सची नक्कल करायची. 
- एखाद्या कार्टूनची नक्कल करताना हा अपघात घडला असावा अशी पोलिसांना शंका आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...