आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच कुटुंबातील 4 जण जिवंत जळाले, 7 महिण्याच्या चिकमुलीचा देखील होरपळून मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार अनियंत्रित होऊन दुसऱ्या दिशेने येणार्या ट्रकखाली गेली. - Divya Marathi
कार अनियंत्रित होऊन दुसऱ्या दिशेने येणार्या ट्रकखाली गेली.

करनाल (हरियाणा)- नॅशनल हायवे-1वर करनालच्या शामगड गावात मंगळवारी पाहटे पावणे 4 वाजता चार लोकांची जिवंत जळून मृत्यू झाला. अमृतसर पासून दिल्लीच्या दिशेने जाणारी एक कार अनियंत्रित होऊन दुसऱ्या दिशेने येणार्या ट्रकखाली गेली. यामुले ट्रक आणि कार दोन्हीमध्ये आग लागली. आग लागल्यामुळे कारचालक, त्याची पत्नी, 7 महिन्याची मुलगी आणि सासू जिवंत जळाले. या अपघातात ट्रक देखील जळाला आहे. मृतांचे शव पोस्टमार्टमसाठी कल्पना चावाला मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहेत.


- पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीच्या हरिनगर निवासी संचित चोपडा (23) त्यांची पत्नी भावना चोपडा, 7 महिन्याची मुलगी तुशरिका आणि सासून निशा भोला हे सर्व अमृतसरवरून दिल्लीला जात होते.
- घनटा शामगड पुलाजवळील आहे. पाहटे चार वाजेच्या सुमारास त्यांची गाडी अचानक अनियंत्रित झाली आणि कर्नालहून चंडीगडकडे जाणाऱ्या ट्रकखाली घुसली.
- जबरदस्त टक्करमुळे ट्रक आणि कार दोन्हींमध्ये आग लागली. ही आग एवढी भीषण होती की कारमधील लोकांना बाहेर निघण्याची देखील संधी मिळाली नाही.
- पाहटेची घटना असल्यामुळे आसपासचे लोक देखील मदतीसाठी येऊ शकले नाही. यामुळे चौघांचा जाग्यावरच जळून मृत्यू झाला.


ट्रक चालकाचा वाचला जिव...
- आगीत ट्रक चालकाची जिव वाचला. ट्रक चालक कसेतरी बाहेर निघण्यात यश मिळवले. परंतु, ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...