आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेयर बँडमुळे गमावला महिलेने जीव, डोक्याच्या कातडीसह कवटीपासून उपटले गेले केस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत - पुनीत कौर - Divya Marathi
मृत - पुनीत कौर

पंचकुला - पिंजौर गार्डन आणि अॅम्युझमेंट पार्क अॅक्वा व्हिलेजमध्ये बुधवारी गो कार्टच्या चैनमध्ये केस अडकल्याने झालेल्या दुर्घटनेत 32 वर्षांच्या पुनीत कौर हिचा मृत्यू झाला. ती पती अमनदीप सिंहबरोबर कार्टिंगसाठी बसलेली होती. हे कुटुंब मूळचे भठिंडाच्या गावातील रामपुरा फूलमधील राहणारे होते. त्या दोघांना एक मुलगाही आहे. त्यांच्याबरोबर पुनीतची आई आणि बहीणही आलेले होते. गो कर्टिंगदरम्यान केस बांधण्यासाठी हेअर बँड दिले जाते. त्याने केस बांधायचे असतात. पण नंतर कोणीही हे चेक करत नाही, की खरंच केस बांधले की नाही. 


अशी घडली दुर्घटना.. 
- अपघाताच्या वेळी गो कार्ट अमनदीप चालवत होता. त्याच्या मते पुनीतच्या हेल्मेटचे लॉक उघडले आणि हेल्मेट पडले. 
- ते उचलण्यासाठी पुनीत खाली वाकली त्याचवेळी तिचे केस मागे चैनमध्ये अडकले. नंतर टायरबरोबर तिचे केस अडकत गेले. 
- या प्रकारामुळे पुनीत कौर हिचे केस थेट मुळापासून म्हणजेच कवटीपासूनच उपटले गेले. ती सीटवलरच बेशुद्ध झाली. 
- तिला सेक्टर 6 च्या जनरल हॉस्पिटलमध्ये आणले तेव्हा तिच्या डोक्यावर केसच नव्हते. रक्तही फार निघत नव्हते. 
- हॉस्पिटलला पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. 


हे असू शकते कारण.. 
- डॉक्टर्सच्या मते झटक्याने मानेचे हाड तुटल्याने किंवा एकदाच संपूर्ण केस चामडीसह उपटले गेल्याने ब्रेन हॅमरेज होऊ शकते. 
- पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे नेमके कारण कळेल. 
- पुनीत तिचा पती अमनदीपबरोबर नातेवाईकांबरोबर आली होती. 
- पुनीतची आई बहीण सर्वच पिंजोरला फिरायला गेले होते. 
- गार्डनमध्ये फिरल्यानंतर सर्व अॅक्वा व्हिलेजमध्ये गेले. अमनदीप आणि पुनीतने येथे गो कार्टिंगचे तिकिट घेतले. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, अपघातानंतरचे काही PHOTOS अखेरच्या स्लाइडवर पाहा व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...